
त्वचेची अॅलर्जी ही केवळ त्वचेला खाज सुटण्या इतकीच मर्यादीत नसते. ॲलर्जीमुळे त्वचेवर लालसरपणा, सूज आणि त्वचेला खाज येऊ शकते, कधीकधी यामुळे त्वचेचे गंभीर आजार देखील उद्भवू शकतात. या अॅलर्जी कशामुळे होतात आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेतल्यास त्यामुळे होणाऱ्या भविष्यातील समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.
मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे यांनी सांगितलं की, काही व्यक्तींना विशिष्ट अशा आहार, वातावरण यांच्या संपर्काने अथवा सहवासाने वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू त्याला अॅलर्जी असे म्हणतात. या प्रतिक्रियेमुळे असंख्य लक्षणे उद्भवू शकतात. यामध्ये त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे, पुरळ येणे, कोरडी त्वचा, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, सूज, फोड, जळजळ होणे, त्वचा सोलणे किंवा गंभीर प्रकरणांमध्ये संसर्ग यासारखी लक्षणे समाविष्ट असू शकतात. ही लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. सामान्य अॅलर्जींमध्ये परागकण, धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस, काही पदार्थ, औषधे, कीटक चावल्याने, तीव्र सुगंध आणि हवामानातील अचानक बदल यांचा समावेश असू शकतो.
त्वचेची ऍलर्जी विविध प्रकारची असते. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे त्वचारोग, ज्यात सामान्यतः तुमची त्वचा डिटर्जंट, स्क्रब, साबण किंवा धातूंसारख्या त्रासदायक घटकांना प्रतिक्रिया देते तेव्हा होतो. एक्झिमा कोरडेपणा, जळजळ आणि खाज सुटते. अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी तुमची त्वचा लाल करू शकतात आणि ऍलर्जीक प्रतिक्रियांमुळे त्वचेवर दिसणारे डाग वाढवू शकतात. त्वचेखाली खोलवर सूज आल्यावर अँजिओएडेमा होतो. अर्टिकेरिया आणि एटोपिक डर्माटायटीस सारख्या इतर ऍलर्जीक स्थितींमुळे त्वचेची सतत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे दैनंदिन कामे सहजतेने करणे कठीण होते.
विविध घटकांमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. कृत्रिम कापडांच्या संपर्कात येणे, कीटकांचा चावा, परागकण, बुरशी आणि पाळीव प्राण्यांच्या कोंडा हे एक प्रमुख कारण असू शकते. जर तुम्हाला स्किनकेअर करायला आवडते परंतु या उत्पादनांमध्ये तीव्र रसायनांचा समावेळ असतो त्यामुळे गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि जळजळ होऊ शकते.
काही लोकांमध्ये सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ किंवा सीफूड सारख्या विशिष्ट पदार्थांमुळे ऍलर्जी दिसून येते. दुसरीकडे, तापमानातील बदल, जास्त घाम येणे किंवा जास्त ताण घेतल्याने इतरांना ऍलर्जी होऊ शकते. कधीकधी, जास्त वेळ सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या ऍलर्जीक प्रतिक्रिया देखील होऊ शकतात ज्यामुळे तुमची त्वचा नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील ठरते.
त्वचेच्या ऍलर्जीमुळे अस्वस्थता वाढते ज्याचा तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर लक्षणीय परिणाम होतो. यामुळे तीव्र खाज सुटणे, वेदना होणे, डाग पडणे किंवा वारंवार ओरखडे पडल्यास त्वचेवर काळे डाग दिसू शकतात. हे समजून घेतले पाहिजे की ऍलर्जीक प्रतिक्रियांमुळे संसर्ग वाढु शकतो. ऍलर्जीक प्रतिक्रियांवर उपचार ऍलर्जीच्या तीव्रतेनुसार बदलू शकतात. ऍलर्जीच्या सौम्य प्रकरणांवर डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे क्रीम किंवा मॉइश्चरायझर्सच्या मदतीने व्यवस्थापन करता येते.
दुसरीकडे, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधे किंवा कॉर्टिकोस्टेरॉईड क्रीमच्या मदतीने गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया बऱ्या करता येतात. ज्ञात ट्रिगर्स टाळल्याने गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया टाळता येतात. नेहमी हायड्रेटेड राहणे, त्वचेची चांगली स्वच्छता राखणे आणि सौम्य स्किनकेअर उत्पादने वापरणे हे देखील यावर फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला दीर्घकालीन त्वचेच्या ऍलर्जीची समस्या आढळून येत असेल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.