Surabhi Jayashree Jagdish
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सतत ताप, थकवा किंवा सूज यांसारख्या समस्या दिसून येतात.
या आजारात रुग्णाला सतत हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा, वजन कमी होणं, भूक न लागणं आणि रात्री जास्त घाम येणं अशी लक्षणं जाणवू लागतात.
ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा, जे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लाझ्मा पेशींवर परिणाम करतात.
ल्युकेमियामध्ये, शरीर जास्त पांढऱ्या रक्त पेशी तयार करू लागतात ज्यामुळे संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते.
लिम्फोमामध्ये, शरीरातील लिम्फ नोड्स, शिरा आणि प्लीहा सारख्या अवयवांवर परिणाम होतो.
मायलोमा शरीराच्या प्लाझ्मा पेशींना नुकसान पोहोचवतं ज्यामुळे अँटीबॉडीजचं उत्पादन कमी होते.
जर एखाद्या व्यक्तीला मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, हिरड्यांमधून रक्तस्त्राव किंवा मलमधून रक्त येत असल्याचं दिसून आलं तर ते हलक्या घेऊ नका.