Monsoon Feet Care : पावसाळ्यात जपा पायांचं सौंदर्य; 'अशी' घ्या पायांची काळजी

Feet Care In Monsoon : पावसाच्या पाण्यामुळे पायांचे आरोग्य धोक्यात येते. पावसात रस्त्यांवर पाणी साचते. त्यामुळे पायांना खाज येणे, पाय सूजणे, पायांवर लाल चट्टे येणे, अॅलर्जी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
Feet Care In Monsoon
Monsoon Feet Care Saam TV

जगभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अशातच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुख्यतः पावसात आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पावसाच्या पाण्यामुळे पायांचे आरोग्य धोक्यात येते. पावसात रस्त्यांवर पाणी साचते. त्यामुळे पायांना खाज येणे, पाय सूजणे, पायांवर लाल चट्टे येणे, अॅलर्जी होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

Feet Care In Monsoon
Rajinikanth Touching Yogis' Feet: सुपस्टार रजनीकांत योगींच्या पाया का पडले? अभिनेत्याने सांगितले कारण

ऋतूबदलामुळे आपले आरोग्य बिघडते. पावसाळ्यात आपल्या आहाराकडे लक्ष देण्यासोबतच त्वचेची काळजी घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आपले पाय मोठ्या प्रमाणात घाण होतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य जपण्यासाठी अशाप्रकारे पायांची काळजी घ्यावी.

कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा

पावसात साचलेल्या पाण्यामुळे आपल्या पायांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे पावसात नियमित बाहेरून आल्यावर पाय कोमट पाण्याने धुवावे. काही वेळाने एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात २० ते २५ मिनिटे पाय टाकून बसावे आणि नंतर बॉडी वॉशने पाय स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर मऊ कपड्याने पाय लगेच कोरडे करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे पायात ओलावा राहत नाही.

पायांची नखे

पावसात पायांच्या नखांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर नखांमध्ये घाण साचून पायाला वास येतो. यामुळे नियमित पायांची नखे कापावीत. रोज बाहेरून आल्यावर नखे स्वच्छ करावी. नखात अडकलेल्या घाणीमुळे पायात बॅक्टेरिया जमा होतात. परिणामी पायांना अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.

पायांना नियमित मॉश्चराइझ करा

पावसात स्किन अॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पायांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना नियमित मॉश्चराइझ करणे महत्त्वाचे आहे. पायांची डेड स्किन काढण्यासाठी देखील मॉश्चराइझचा वापर केला जातो.

पेडिक्युअर

पावसात पायांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पेडिक्युअर करू शकता. त्यामुळे पायांची स्वच्छता होईल आणि त्वचा देखील मऊ राहील. पावसामध्ये फंगल इंफेक्शनमुळे अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पावसात सँडल घालण्याऐवजी पावसाळी बूटांचा वापर करा.

पावसाळी शूज वापरा

पावसात पावसाळी शूजचा वापर करा . पावसात सर्व बाजूंनी बंद असलेले शूज घालणे टाळा. यामुळे पायांना हवा लागत नाही आणि पायांमधून वासही येऊ लागतो. तसेच जास्त ओल्या शूजपासून दूर राहा. त्यामुळे पायांना खाज येते. पायांना योग्य पद्धतीने फिट बसतील असेच शूज पावसात घालावे.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Feet Care In Monsoon
Rajinikanth Touching Yogis' Feet: सुपस्टार रजनीकांत योगींच्या पाया का पडले? अभिनेत्याने सांगितले कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com