Vastu Tips: वास्तुदोष म्हणजे राहत्या जागेत उर्जेचे असंतुलन. हे असंतुलन घरातल्या खोल्या, फर्निचर किंवा रंगांच्या अयोग्य जागेमुळे किंवा निवडीमुळे होते,असे मानले जाते की घरामध्ये वास्तु दोष असल्यास नकारात्मक भावना निर्माण होतात आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. वास्तुदोषाच्या मुख्य लक्षणांमध्ये वारंवार वाद, आर्थिक समस्या आणि झोपेच्या समस्या यांचा समावेश होतो. बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक हानी देखील होते.
कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्या स्वप्नातील घर बांधते तेव्हा ती त्याच्या निर्माणासाठी आपले सर्वस्व पणाला लावतो. मात्र,जाणूनबुजून किंवा नकळत घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे घरात (Home) वास्तुदोष निर्माण होतात. या दोषांमुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा राहू लागते. यामुळे नुकसानही होते. पैसे (Money)खर्च न करता आणि घराची कोणतीही पडझड न करता घराची वास्तू कशी सुधारली जाऊ शकते ते आज आपण जाणून घेऊया.
घरामध्ये वास्तुदोष असल्यास कलश घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. कलश स्वच्छ आणि तांब्याचे असावे याची कृपया नोंद घ्यावी. श्री गणेशाला अडथळे दूर करणारा मानले जाते. घरामध्ये कलश बसवल्याने सर्व कामे विना अडथळा पूर्ण होतील.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकवाने नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिक बनवा. यामुळे सर्व बाजूंनी येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तू दोष दूर होतात. दर मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळाशी संबंधित नकारात्मक प्रभावही दूर होतील.
स्वयंपाकघर हे घराच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी विशेषतः महत्वाचे मानले जाते. वास्तूच्या नियमांनुसार आग्नेय कोपरा म्हणजेच आग्नेय दिशा ही स्वयंपाकघरासाठी सर्वात योग्य जागा मानली जाते. जर तुमचे स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असेल तर आगीच्या कोपऱ्यात बल्ब लावा आणि तो बल्ब रोज काळजीपूर्वक लावा. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील.
घरामध्ये घोड्याची नाल लटकवणे खूप शुभ मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याचा नाल ठेवल्याने संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. घोड्याची नाल तुम्हाला स्वतःला सापडलेली असेल तर अती उत्तम. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही कचरा साचू देऊ नका तसेच तिथे जड उपकरणे ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात वास्तुशी संबंधित दोष दिसू लागतात.
असे मानले जाते की घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण-पश्चिम दिशा सर्वात योग्य आहे. तथापि, जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि दुसरा कोणताही पर्याय नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जा घेईल आणि सर्व कामे सुरू होऊ शकतील.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.