SIM Card Port News : १ जुलैपासून सिमकार्ड पोर्ट करणं झालं कठीण; वाचा काय आहे नवा नियम?

SIM Card Port Update : दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI-Telecom Regulatory Authority of India) जुलै महिन्यापासून सिम पोर्ट करण्याच्या नियमांत बदल केला आहे.
SIM Card Port Update
SIM Card Port NewsSaam TV
Published On

सिम कार्ड पोर्टेबिलिटीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI-Telecom Regulatory Authority of India) जुलै महिन्यापासून सिम पोर्ट करण्याच्या नियमांत बदल केला आहे. या बदलामुळे नागरिकांना सिम पोर्टसाठी जास्त कालावधीची वाट पहावी लागेल. तसेच पोर्ट करणे कठीण होणार आहे.

SIM Card Port Update
SIM Card New Rules : 52 लाख कनेक्शन बंद, 66 हजार WhatsApp खाते ब्लॉक, सिम कार्ड घेण्यासाठी बदलले नियम

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुविधेसाठी ग्राहकांना सिम कार्ड पोर्ट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र काही व्यक्ती याचा गैरवापर करत असल्याचं अनेक घटनांतून समोर आलं आहे. त्यामुळे TRAI ने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय.

पोर्ट करण्याचा कालावधी किती

जर तुम्ही नवीन सिम खरेदी केलं असेल तर ते तुम्हाला लगेचच पोर्ट करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ७ दिवसांची वाट पहावी लागणार आहे. बऱ्याचदा आपलं सिमकार्ड खराब होतं किंवा फोन चोरीला जातो. त्यावेळी आपण नवीन सिम खरेदी करतो. आता तुम्ही सुद्धा या कारणांमुळे नवीन सिम खरेदी केले आणि लगेचच ते पोर्ट करण्याचा निर्णय घेतला तर हे सिम तुम्हाला पोर्ट होऊन परत मिळण्यासाठी ७ दिवसांचा वेळ लागणार आहे.

सध्या सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यातील बऱ्याच घटना या सिम कार्डचा दुरउपयोग करून करण्यात आल्यात. अशा अनेक घटना आजवर समोर आल्यात. व्यक्ती सिम कार्ड खरेदी करतात त्यानंतर काही चुकीच्या कामांसाठी त्याचा वापर करून ते सिम पोर्ट करतात. या घटनांवर आळा घालण्यासाठीच TRAI ने हा निर्णय घेतला आहे.

हा सुधारीत नियम TRAI ने 14 मार्च 2024 मध्ये अधिसूचित केला होता. त्यावर निर्णय घेताना झालेल्या बैठकीत १० दिवसांचा कालावधी सुचवण्यात आला होता. मात्र नंतर यावर ७ दिवसांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. सोमवर १ जुलैपासून हा नवीन नियम सुरू झाला आहे.

SIM Card Port Update
New Sim Card Rules : सिम कार्डची प्रोसेस आता Digital स्वरुपात! नव्या वर्षात लागू होणार नवे नियम; वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com