Know What Is Shivmuth Puja Vidhi and Subh Muhurth:
साल २०२३ मधील आज पहिला श्रावण सोमवार आहे. हिंदू धर्मात या महिन्याला मोठं महत्व आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जात असून शंकराला समर्पित केला जातो. श्रावण महिन्यात हिंदू धर्मातील व्यक्ती उपवास करतात. असं म्हटलं जातं की, या महिन्यात उपवास केल्याने शंकर देव प्रसन्न होतात. त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मार्गात आलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होते. (Latest Marathi News)
या काळात शंकरदेव म्हणजेच भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. मोठे नैवद्य, पूजा आणि उपवास केले जातात. मात्र या सर्वांमध्ये श्रावणातल्या सोमवारी काही खास मंत्रांचा जप केल्याने देखील भोलेनाथ प्रसन्न होतात. त्यामुळे पवित्र मनाने कोणत्या मंत्रांचा जप जास्तीत जास्त करायला हवा ते जाणून घेऊ.
श्रावणी सोमवारसाठी मंत्रजप
"ओम नमः शिवाय..!!" या मंत्राचा जप केल्याने मन प्रसन्न राहते. घरात सुख शांती येते.
"कर्पूर गौरम करुणावतारम् संसारसारम् भुजगाईंद्र हरम सदा वसंतम् हृदय अरविंदे भवम भवानी साहित्यम् नमामि..!!" तुम्ही एखादे काम हाती घेतले आहे आणि ते पूर्ण होत नसेल तर या मंत्राचा जप करावा याने भोलेनाथ प्रसन्न होतील.
शंकराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही "ओम त्रयंभकम जजमहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर मुखिया ममृतात्..!!" या मंत्राचाही जप करु शकता.
पहिली शिवामूठ श्रावण सोमवार २१ ऑगस्ट २०२३
पहिली शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे. पहिल्या शिवमूठीत तांदूळ वाहिले जातात. तशी प्रथाच आहे. शिवामूठ वाहताना तुम्ही ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।‘ हा मंत्र म्हटल्यास उत्तम.
प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा.. माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, “ असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.