Shardiya Navratri 2023: नवरात्रीच्या पूर्वी घरातून या वस्तू बाहेर फेकून द्या, अन्यथा...

Shardiya Navratri 2023 Date : आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam Tv
Published On

Remove These Things Before Navratri 2023 :

लवकरच शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु होईल. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसापासून पुढील नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते.

यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा व अर्चना केली जाते. तसेच येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी बळ मागितले जाते. सणसमारंभ आले की, आपण घराची साफसफाई करतो. परंतु, सफाई केल्यानंतर देखील काही जुन्या वस्तू टाकून न देता त्या घरात तशाच ठेवतो.

असे म्हटले जाते की, घरात (Home) तुटलेल्या किंवा अधिक कचरा असणाऱ्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते. ज्यामुळे आपल्याला आर्थिक (Money) संकटांना सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी जर तुम्ही देखील घराची साफसफाई करत असाल आणि नकारात्मकता दूर करायची असेल तर या गोष्टी आजच फेकून द्या

1. तुटलेली मूर्ती

घरामध्ये कोणतीही तुटलेली मूर्ती ठेवू नये, हे अशुभ समजले जाते. तसेच या तुटलेल्या मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जन करा.

Shardiya Navratri 2023
Navratri Ghatasthapana Muhurat 2023: शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

2. जुने चप्पल किंवा शूज

तुमच्या घरात जुने चप्पल किंवा शूज (Shoes) ठेवत असाल आणि ते वापरत नसाल तर आजच टाकून द्या. वास्तूशास्त्रानुसार घरात चप्पल किंवा शूज ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

3. घड्याळ

घरात बंद घड्याळ ठेवू नका. यामुळे घरातील माणसांची प्रगती थांबते. तसेच नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. त्यासाठी घरातील अनावश्यक वस्तू फेकून द्या.

Shardiya Navratri 2023
Birth Numerology : या तारखेला जन्मलेली मुलं असतात अधिक बुद्धीवान, तुमची जन्मतारीख आहे का यात?

4. तुटलेली काच

घरात, पर्समध्ये तडा गेलेली काच ठेवू नका. अनेकांना पर्समध्ये छोटा आरसा ठेवण्याची सवय असते. परंतु तडा गेलेली काच ही घरात नकारात्मक ऊर्जा तयार करते. ज्यामुळे आर्थिक नुकसान होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com