Navratri 2023 Kalash Sthapana: शारदीय नवरात्रीत कलश स्थापना करताय? जाणून घ्या पूजा लिस्ट आणि मुहूर्त

Shardiya Navratri 2023 Ghatasthapana Date : यंदा नवरात्रीचा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam tv
Published On

Shardiya Navratri 2023 Puja List:

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा नवरात्रीचा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रुपाची पूजा केली जाते.

आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. भारतात चार प्रकारच्या नवरात्रीचा उत्साह साजरा केला जातो. पहिली चैत्र नवरात्री तर दुसरी शारदीय नवरात्री. उर्वरीत दोन या गुप्त नवरात्री म्हणून ओळखल्या जातात.

Shardiya Navratri 2023
Navratri Ghatasthapana Muhurat 2023: शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

आश्विन महिन्याच्या प्रतिपदेला घटस्थापना असते. या दिवशी घरोघरी घट बसवले जातात. जर तुम्ही देखील कलश स्थापना करणार असाल तर या दिवशी जाणून घ्या पूजेत (Puja) कोणते साहित्य वापरले जाते.

1. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त (Muhurta)

  • घटस्थापना शुभ मुहूर्त - १५ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११. ४४ पासून

  • कलश स्थापना - १५ ऑक्टोबर २०२३ दुपारी १२.३० वाजता

  • नवरात्री (Navratri) 2023 प्रारंभ तारीख- 15 ऑक्टोबर 2023

  • विजयादशमी- 24 ऑक्टोबर 2023

2. घटस्थापना पूजा साम्रगी लिस्ट

कलश, गंगाजल, गंधगोळी, अक्षत, नाणे, गहू, आंब्याच्या डहाळे, मातीचे भांडे, माती, मातीवर ठेवण्यासाठी स्वच्छ कापड, गहू किंवा बार्ली, मातीचा दिवा, तूप, कापसाची वात, सिंदूर, लाल कपडे, नारळ.

Shardiya Navratri 2023
Navratri Rangoli Designs 2023 : नवरात्रोत्सवानिमित्त घरासमोर दररोज काढा या सुंदर रांगोळ्या, पाहा सोप्या डिझाइन्स

3. देवीच्या मेकअपसाठी साहित्य

लाल चुनरी, बांगड्या, पायाची अंगठी, अँकलेट, पुष्पहार, कानातले, नथ, सिंदूर, बिंदी, मेहंदी, लॅम्पब्लॅक, अलता, नेल पॉलिश, लिपस्टिक, परफ्यूम

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com