Shardiya Navratri 2023 Festival : नवरात्रीत पटकवा मानाची पैठणी, स्पर्धेचे नियम जाणून घ्या

Navratri 2023 Celebration : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना नवरात्रोत्सवात मानाची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
Shardiya Navratri 2023 Festival
Shardiya Navratri 2023 FestivalSaam Tv
Published On: 

Navratri 2023 Competition :

नवरात्रौत्सव हा आदिशक्तीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. नवरात्रीच्या दिवसांत आनंदाची, भक्तीच्या वातावरणाची अनुभूती होते. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे.

स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. मात्र, सध्या महिलांना विविध आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. त्यांचा हा प्रवास अधिक चांगला व्हावा, तसेच यंदाचा नवरात्रोत्सव विशेष व्हावा म्हणून 'सकाळ'ने विशेष स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री दीपक साडीज्, पनवेल यांच्या सहयोगाने महिलांसाठी 'नवरात्र नवरंग स्पर्धा' होणार आहे. या स्पर्धेचे श्री दीपक साडीज्, पनवेल प्रायोजक आहेत.

नवरात्रीत (Navratri) नवरंगांचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी एक वेगळा रंग घेऊन हा उत्सव साजरा करण्याकडे महिलांचा (Women) कल असतो. त्या विशिष्ट रंगाची वस्त्रे परिधान करून महिला हा उत्सव साजरा करतात. महिलांच्या ग्रुपने रोज त्या दिवसाच्या रंगाप्रमाणे कपडे घालून एक ग्रुप फोटो 'सकाळ'कडे पाठवायचा आहे.

या फोटोमधील एका भाग्यवान महिलेच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाईल, ती महिला त्या दिवसाची पैठणीची मानकरी असेल तर फोटोमध्ये सहभागी अन्य महिलांनाही हमखास बक्षीस मिळणार आहे. या विजेत्यांना 'सकाळ'कार्यालयातून संपर्क केला जाईल. नऊ दिवसांतील सर्व फोटोमधून एक भाग्यवान विजेती निवडण्यात येणार असून बंपर बक्षीस म्हणून खास पैठणी देण्यात येणार आहे. यासाठी विजेत्यांनी फोटो प्रसिद्ध झालेला 'सकाळ'चा अंक सोबत आणायचा आहे.

Shardiya Navratri 2023 Festival
Shardiya Navratri 2023 Festival : उत्सव नवरंगाचा, मान पैठणी जिंकण्याचा; नियम आणि अटी काय?

1. स्पर्धकांसाठी सूचना

  • फोटोखाली ग्रुपचे नाव व विभाग असावा.

  • रोज दुपारी तीनच्या आत फोटो पाठवावा.

  • किमान ५ महिलांचा ग्रुप असावा.

  • व्हॉट्सअॅप (Whatsapp) क्रमांक केवळ फोटो पाठवण्यासाठी आहे, त्यावर कोणी फोन करू नये.

  • फोटो पाठवण्यासाठीचा व्हॉट्सअॅप क्रमांक ८८८८८४९२२३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.