Shardiya Navratri 2023 : उत्सव प्रेमाचा, उत्साह आनंदाचा..., नवरात्रीत गरबा का खेळला जातो?

Shardiya Navratri 2023 Date : आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होईल. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam tv
Published On

Importance Of Garba And Dandiya :

नवरात्रीतचा उत्सव अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होईल. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

काळानुसार सणांमध्ये लक्षणीयरित्या बदल होत आहे. सणांचं स्वरुप जरी बदलत असलं तरी त्याचा गाभा, उत्साह, ऊर्जा आणि संस्कृती-परंपरा जतन केली जाते. भारतातील सण-उत्सव हे पृथ्वीवरील वातावरण, बदलणारे ऋतूमान याच्याशी मिळते जुळते आहे. त्यातील एक गरबा.

नवरात्रीच्या (Navratri) काळात गरबा आणि दांडियाला विशेष महत्त्व आहे. स्पर्धेच्या आणि फॅशनच्या या युगात आजही गरबा तितक्याच उत्साहपूर्वक खेळला जातो. नवरात्रीच्या या काळात अनेक ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजनही केले जाते. परंतु, नवरात्रीत गरबा-दांडिया का खेळले जाते? याचा नवदुर्गेशी संबंध काय? याबाबत जाणून घेऊया

Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023: साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्ती पीठ महाराष्ट्रात, मुंबई-पुण्याहून फक्त ६ तासांच्या अंतरावर, कसे जाल?

1. नवरात्रीत गरबा का खेळला जातो?

गरबा आणि दांडियाचा इतिहास गुजरातशी जोडला गेला आहे. हे नृत्य नवरात्रीतच केले जाते. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील नऊ दिवसांच्या युद्धाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. पारंपारिकपणे, गरबा हे मातीचे भांडे असते ज्यामध्ये दिवा ठेवला जातो. ज्याला गुजरातमध्ये (Gujrat) गरबी असे म्हणतात. या मातीच्या मडक्यांभोवती गरबा नृत्य केले जाते, ज्याला 'गर्भा दीप' म्हणतात.

2. हा सण का साजरा केला जातो?

असे म्हटले जाते की, महिषासुर राक्षसाच्या दहशतीमुळे गुजरातमधील लोक खूप त्रस्त झाले होते. त्याच्या समस्या पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गा देवीला आवाहन केले. या नऊ दिवसात दुर्गादेवीने युद्घ केल्यानंतर महिषासुर राक्षसाचा वध केला. त्यामुळे नवरात्रीचा सण (Festival) साजरा केला जातो.

Shardiya Navratri 2023
Navratri Ghatasthapana Muhurat 2023: शारदीय नवरात्रौत्सव कधी आहे? जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com