Eye Care: वाढणारे प्रदूषण आणि स्क्रीन टाईम; डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

Eyesight Improve Naturally Tips: वेगाने वाढणारे प्रदुषण आणि स्क्रीन टाईम मुळे डोळे कमजोर होतात. कोणत्या न कोणत्या डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असतात. जर तुम्हाला या गोष्टीपासून वाचायचे असेल तर डोळ्यांची काळजी घ्यायला सुरूवात करा.
Eye Care
वेगाने वाढणारे प्रदूषण आणि स्क्रीन टाईम; डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?Saam Tv
Published On

आजच्या डिजिटल आणि व्यस्त आयुष्यात डोळ्यांचा सर्वात जास्त उपयोग केला जोतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि प्रदुषण यांसारख्या घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्याला धोका निर्णाण झाला आहे. आकडेवारीनुसार विचार केला तर, भारतात ४ कोटी लोकांना दिसत माही, तर २० कोटी लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्या उद्धभवत आहे.

स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे आणि पोषणाचा अभाव यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होऊ शकते. जर तुमच्या सोबतसुद्धा असे होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची कमकुवत दृष्टी वाढवू शकता. तर मग जाणून घेऊया ७ सोप्या टिप्स. जे तुमच्या डोळ्यांचे आरेग्य निरोगी ठेवू शकतात.

Eye Care
Eyes Health: डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी लावा 'या' सवयी!

१. २०-२०-२० मिनिटांचा नियम फॉलो करा

जर तुम्ही सलग कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम करता. किंवा मोबाईलवर रिल्स पाहत असाल, तर २०-२०-२० हा नियम फॉलो करा. दर २० मिनिटांनी, २० फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे २० सेकंज पाहात राहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होईल.

२. आहारात डोळ्यांसाठी चांगले अन्न घ्या

डोळ्यांसाठी आवश्यक गोष्टींचा समावेश संतुलित आहारात करा. Vitamin A (गाजर, रताळं), Vitamin C (लिंबू, संत्र), Omega-3 (fatty acids - मासे, अळशी), झिंक आणि Antioxidants (बदाम, भोपल्याच्या बीया) हे पदार्थ खा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहेत.

३. UV प्रोटेक्शन असणारे चष्मे घाला

उन्हात बाहेर निघताना UV प्रोटेक्शन असणारे चष्मे घाला. ते तुमच्या डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. जे रेटिनाला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचवत नाही. बऱ्याचदा यामुळे डोळ्यांना धोका पोहचू शकतो.

४. झोप पूर्ण घ्या

दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने डोळ्यांना थकवा आणि सूज येण्यापासून संरक्षण मिळते. यामुळे दृष्टी टिकून राहण्यास मदत होते. जास्त वेळ मोबाईलकडे पाहिल्याने तुमचे डोळे कमकुवत होतात. ही सवय टाळा.

Eye Care
Eyes Twitching: डोळे का फडफडतात?

५. शरीराला हायड्रेटेड ठेवा

शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात. कमी पाणी पिल्याने डोळे कोरडे आणि जळजळ होऊ शकतात, म्हणून डोळे हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.

६. डोळे स्वच्छ ठेवा

दररोज स्वच्छ पाण्याने डोळे धुवा, हात धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नका आणि धुळीच्या ठिकाणी गेल्यास चष्मा घाला. यामुळे डोळ्यांना इजा होणार नाही.

७. वेळोवेळी तुमचे डोळे तपासा

जर तुम्ही चष्मा लावला असेल किंवा डोळ्यांचा कोणताही त्रास होत असेल तर दर ६ महिन्यांनी एकदा डोळे तपासा. जर आजार वेळेवर आढळला तर उपचार करणे सोपे होते. म्हणून, निष्काळजीपणा टाळा आणि अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com