Ankush Dhavre
जास्त तणाव, चिंता किंवा मानसिक थकवा यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येऊन डोळे फडफडू शकतात.
अपुरी झोप घेतल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि डोळे फडफडण्याची शक्यता वाढते.
मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे डोळे फडफडू शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डोळे कोरडे पडतात आणि फडफडण्याची शक्यता वाढते.
जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा अल्कोहोल घेतल्याने स्नायूंवर परिणाम होऊन डोळे फडफडतात.
स्क्रीनसमोर दीर्घकाळ बसल्यास डोळे थकतात आणि फडफडू लागतात.
धूळ, परागकण किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांना अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे फडफडण्याची समस्या निर्माण होते.
कधी कधी मेंदूशी संबंधित नसांमध्ये बिघाड झाल्यास डोळे फडफडू शकतात.
हे केवळ माहितीसाठी आहे, असं काही जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.