After Life: मृत्यूनंतर घडतात या घटना; मृत्यूच्या ८ मिनिटांने उठली महिला, सांगितला धक्कादायक अनुभव

Life After Death: मृत्यू हा मानवाच्या जीवनातील अंतिम सत्य मानला जाते, परंतु काही वेळा काही अनुभव हे या सत्याला आव्हान देतात. अमेरिकेतील ३३ वर्षीय ब्रियाना लाफर्टी हिच्या अनुभवाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.
Life After Death
Life After DeathSaam Tv
Published On

After Death Life: मृत्यू हा मानवाच्या जीवनातील अंतिम सत्य मानला जाते, परंतु काही वेळा काही अनुभव हे या सत्याला आव्हान देतात. अमेरिकेतील ३३ वर्षीय ब्रियाना लाफर्टी हिच्या अनुभवाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. ती एका न्यूरोलॉजिकल आजारामुळे काही काळासाठी मृत घोषित करण्यात आली होती, परंतु ८ मिनिटांनंतर ती पुन्हा जिवंत झाली आणि तिने त्या काळात अनुभवलेले कथन केले.

ब्रियाना मायोक्लोनस डिस्टोनिया या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती, यामुळे तिच्या स्नायूंमध्ये अनैच्छिक हालचाली होत होत्या. या आजारामुळे तिची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परंतु ८ मिनिटांनंतर तिच्या मेंदूचे कार्य पुन्हा सुरू झाले आणि ती शुद्धीवर आली.

Life After Death
Badshah: 'मला तिच्यासोबत मुलं...'; तारा सुतारियासोबत डेटिंगच्या अफवांमध्ये २९ वर्षीय गायिकेबद्दल असं का म्हणाला बादशाहा

या ८ मिनिटांच्या काळात ब्रियानाने अनुभवले की तिची आत्मा शरीरापासून वेगळा झाला होता. तिला कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही आणि ती शांत होती. तिने असेही सांगितले की, तिने काही अशा अस्तित्वांची अनुभूती घेतली जी मानवी नव्हती. या अनुभवांनंतर तिला जाणवले की मृत्यू हा एक भ्रम आहे आणि आत्मा कधीही मरत नाही.

Life After Death
Pithla Bhakri Recipe: गावरान स्टाईल झणझणीत पीठलं भाकर बनवा घरच्या घरी वापरा 'ही' सोपी रेसिपी

ब्रियानाच्या या अनुभवाने मृत्यू आणि आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे. तिच्या वर्णनाने अनेकांना मृत्यूच्या पलीकडील जीवनाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. या अनुभवामुळे आत्मा, चेतना आणि अस्तित्व याबद्दलच्या पारंपरिक समजुतींना नवीन दृष्टिकोन मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com