Badshah: 'मला तिच्यासोबत मुलं...'; तारा सुतारियासोबत डेटिंगच्या अफवांमध्ये २९ वर्षीय गायिकेबद्दल असं का म्हणाला बादशाहा

Badshah: भारतीय रॅपर बदशाह ने नुकत्याच एका चाहत्याच्या ट्विटर प्रश्नावर दिलेला खुलासा सोशल मिडीयावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
Badshah
BadshahSaam Tv
Published On

Badshah: भारतीय रॅपर बदशाह ने नुकत्याच एका चाहत्याच्या ट्विटर प्रश्नावर दिलेला खुलासा सोशल मिडीयावर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी एक चाहत्याने विचारलं की तो दुआ लीपासोबत संगीत सहकार्य करणार आहे का, त्या वेळी बदशाहने "I’d rather make babies with her, bro" असं उत्तर दिलं . या विधानाने सोशल मिडीयावर प्रचंड खळबळ उडाली; काहींनी या उत्तराला हसण्यावारी घेतल आहे. तर, काहींना या उत्तराला चीप असे म्हटले आहेत.

त्यानंतर बदशाहने सोशल मिडीयावर लगेचच स्पष्टीकरण दिलं त्याने लिहीलं की, "I think one of the most beautiful compliments that you could give to a woman that you really admire is to wish for her to mother your children. Meri soch nahi tumhari soch…" या स्पष्टीकरणाने त्याने हे विधान एक 'प्रशंसा-पुर्ण' कौतुक म्हणून म्हटलं, आणि जर काहींना हे बेजबाबदार वाटलं तर ते त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून आहे, असं त्याने स्पष्ट केलं. पण काहींनी याला सारवासारव करत असल्याचे म्हटले आहे.

Badshah
Sonali Bendre: कर्करोगावर मात करणाऱ्या सोनालीला दोनदा न्यू यॉर्कला भेटायला गेला 'हा' अभिनेता; आठवण सांगताना भावूक झाली अभिनेत्री

या वादामुळे सोशल मिडीयावर वेगळीच चर्चा रंगली आहे. काहींनी बदशाहचा प्रत्युत्तर समजून घेतला आणि त्याला 'कॉम्प्लिमेंट' म्हटले, तर काहीजणाने हे एक "explicit sexual harassment" मानलं . रेडीटवर देखील या विषयावर रंगीत चर्चा आहे.

Badshah
Elegant Blouse Designs: ट्रेडिशनल साडीवर हाफ हाताच्या ब्लाउजचे हे डिझाईन्स ट्राय करा मिळेल एलिग्नंट क्लासी लूक

दरम्यान, बदशाहचा फॅमिली बॅकग्राऊंडही चर्चेत आला,त्याला एक मुलगी आहे आणि तो पूर्वी विवाहित होता. यामुळं, त्याच्या या अगदी खुले विधानामुळे आणखी चर्चा वाढली आहे . बदशाह सध्या ‘The Unfinished Tour’ अंतर्गत अमेरिका दौऱ्यावर आहे. त्यामुळेच त्याचा हा सोशल मीडिया स्टेटमेंट त्याच्या संगीत आणि व्यक्तिमत्वाबद्दल नव्या आणि काहीसं वादग्रस्त दृष्टिकोनात येतो. पुढे काय रंगत आहे, ते पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com