सरकारी नोकरीचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. SBI PO परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी सुर्वणसंधी आहे.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बुधवार, 6 सप्टेंबर 2023 रोजी बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार (No.CRPD/PO/2023-24/19), एकूण 2000 PO पदांची भरती केली जाणार आहे.
1. किती पदांसाठी भरती?
810 सर्वसाधारण प्रवर्गासाठी
540 पदे ओबीसी
200 EWS
300 SC
150 पदे ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
2. SBI PO भरतीसाठी अर्ज प्रक्रिया
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आजपासून म्हणजेच गुरुवार, 7 सप्टेंबर 2023 पासून 2000 PO पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार बँकेच्या (Bank) अधिकृत वेबसाइट, sbi.co.in वरुन अर्ज करु शकतात.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि शुल्क
SBI PO परीक्षा 2023-24 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज करण्यासाटी उमेदवारांना ७५० रुपये ऑनलाइन (Online) पद्धतीने भरावे लागणार आहे. तसेच SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना फी भरण्याची आवश्यकता नाही.
4. पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
5. वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.