Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री आमावस्येला 'या' चुका पडतील महागात; पितृदोष कधीच दूर होणार नाही

Sarva Pitru Amavasya : सर्वपित्री आमावस्येला 'या' चुका केल्यास पितृदोष कधीच दूर होत नाही. त्यामुळे हा दोष दूर कसा करायाचा याची माहिती जाणून घेणार आहोत.
Sarva Pitru Amavasya
Sarva Pitru Amavasya 2024Saam TV
Published On

हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सवाला जितकं महत्व असतं तितकंच पितृ पक्षाला सुद्धा महत्व दिलं जातं. या दिवसांमध्ये प्रत्येक घरात नैवेद्याचं जेवण बनवलं जातं. यामध्ये पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ सुद्धा बनवले जातात. पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना सुद्धा केली जाते.

Sarva Pitru Amavasya
Ashadh Amavasya 2024: आषाढी अमावस्येला 'या' वस्तू करा दान, होईल आर्थिक भरभराट

अशात काही व्यक्तींच्या शुल्लक चुकांमुळे देखील मोठ्या घटना घडतात आणि त्यांच्यामागे पितृदोष सुरू होतो. पितृदोष असल्याने त्या व्यक्तीची प्रगती खुंटते. मार्गत सतत अडथळे येतात. हाती घेतलेलं एकही काम पूर्ण होत नाही. सतत अपयश येत राहते. प्रगतीचा मार्ग पूर्णता खुंटतो आणि अडचणी वाढू लागतात.

पितृदोष असलेल्या व्यक्तींना ब्राम्हणांकडून पितृपक्षात काही पुजा करण्यास सांगितले जाते. यामध्ये पितरांची शांती केली जाते. पितरांची शांती केल्याने मार्गातील अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. अनेक व्यक्तींना आपल्या घरातील पूर्वजांची तारीख माहिती नसल्यास त्या पितृपक्षात पुजा करतात. तर काही व्यक्तींना पितृपक्षातील तारीख देखील माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वपितरी अमावस्या असते. या अमावस्येला सर्व प्रकराच्या मृत व्यक्तींसाठी पुजा केली जाते. यावेळी आपण काही महत्वाच्या चुका आवश्य टाळल्या पाहिजेत.

या व्यक्तींचे श्राद्ध करा

अमावस्येला ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी तर्पण अर्पण केले पाहिजे. तसेच ज्या व्यक्तींची मृत्यू तारीख तुम्हाला माहिती नाही त्यांच्यासाठी तुम्ही सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करू शकता.

केस आणि नखं

सर्वपित्री अमावस्या हा पितरांचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी कोणतीही नवीन खरेदी करू नका. शिवाय या दिवशी तुम्ही केल आणि नखं कापणे टाळलं पाहिजे. तसे केल्यास तुमच्यमागे पितृदोष सुरू होण्याची शक्यता असते.

कुणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका

सर्वपित्री अमावस्येला दान घेण्यासाठी अनेक व्यक्ती बाहेर फिरत असतात. त्यामुळे तुमच्या दारावर काही प्राणी किंवा एखादी व्यक्ती आपलं पोट भरण्यासाठी आली तर त्यांच्याशी योग्य वर्तन करा. तसेच त्यांना रिकाम्या हाताने पुन्हा पाठवू नका. घरात जो काही भाकर तुकडा असेल तो त्यांना खाऊ घाला. या गोष्टी फार शुल्लक आहेत. मात्र यामध्ये चुका केल्याने तुमच्यामागे सुद्धा पितृदोष सुरू होऊ शकतो.

Sarva Pitru Amavasya
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' वस्तू खरेदी करु नये अन्यथा....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com