Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!

Yevla Farmer Success Story : कांदा, मका आणि भाजीपाला पिकांमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना सरला चव्हाण यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीचा धाडसी निर्णय घेतला. अभ्यास, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यशस्वी शेती करत लाखोंची कमाई केली.
Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!
Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!meta ai
Published On

Ajay Sonavane

शेती म्हटलं की सगळ्यात आधी चित्रं उभ राहतं ते पारंपारिक पीक आणि त्यातून मिळणार उत्पन्न. मात्र नाशिकच्या येवला जिल्ह्यातील सरला चव्हाण या महिला शेतकऱ्याने चौकटी बाहेर जाऊून विचार केला. ज्याचा फायदा आज त्यांना लाखोंमध्ये होत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणे हे काय असते ते सरला यांनी केलेल्या कामगिरीमुळे दिसून येत आहे. ड्रॅगन फ्रु़ट लागवडीचा एक निर्णय घेतला आणि यामुळे महाराष्ट्राच्या शेतीला नवी दिशा सरला यांच्या स्वप्नांना बळ मिळाले.

सरला चव्हाण यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील रायते या गावी ५ एकर शेती आहे. सुरूवातीला या शेतात जिरायती पिकांची शेती केली जायची. त्यानंतर मका, कांदा, वांगी , टोमॅटो आणि मिरची यांसारखी पारंपारिक पिके घेतली जात होती. मात्र उत्पादन खर्च जास्त आणि मिळणार उत्पन्न कमी अशी परिस्थिती होती. याआधी द्राक्ष लागवडीचाही प्रयोग केला होता. मात्र भांडवलाच्या अडचणीमुळे तो प्रयोग यशस्वी झाला नाही.

ड्रॅगन फ्रुटचे स्वप्न

अशा परिस्थितीत सरला ताईंनी हार न मानता ड्रॅगन फ्रुटचे स्वप्न उराशी बाळगले. आपल्या मातीत अशी विदेशी फळे होणारच नाही. बाईचे कष्ट आणि पैसे वाया जाणार. अशा अनेक टिका त्यांच्यावर झाल्या पण त्यांनी हार न मानता परराज्यात जाऊन प्रशिक्षण घेतले आणि आपल्या पंखांमध्ये बळ भरले. लागवड, खांबांची रचना, पाणी व्यवस्थापन, बाजारपेठ यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यानंतर २०१९ मध्ये दोन एकरांत ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला.

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!
Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?

खतांचा खर्च कमी केला

सुरूवातीला लागवडीला भरपूर खर्च होणार याचे भान ठेवूनच खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष देऊ लागल्या. त्यासाठी शेततळे, बायोगॅस स्लरी, गांडूळ खत निर्मिती, हिरवळीची खते इ.अनेक गोष्टींचा प्रयोग घरी केला. ज्यामुळे खतांचा खर्च कमी झाला. रोपे, मशागत आणि लागवडीसाठी एकरी सुमारे ३.७५ लाखापर्यंत खर्च आला. या प्रयोगात त्यांचे घरचे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

पहिल्याच टप्प्यात ३ ते ४ टन उत्पादन मिळालं

पहिल्याच टप्प्यात ३ ते ४ टन उत्पादन मिळालं. त्यामुळे सुरूवातीचा भांडवली खर्च भरून काढण्यास मदत झाली. त्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि लागवडीचे क्षेत्र वाढवले. सध्या सरला चव्हाण चार एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटचं पीक घेत आहेत. मोठे ड्रॅगन फ्रुट, छोटे ड्रॅगन फ्रुट,विविध रंगांचे आणि चवीचे ड्रॅगन फ्रुट, त्यांचे वजन, जंबो फळे या विविधतेमुळे आणि योग्य व्यवस्थापनामुळे १३ ते १४ टनांपर्यंत डरदोई उत्पन्न मिळू लागले आहे.

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!
Cold symptoms: सर्दी आणि फ्लूमध्ये नेमका फरक काय? ही लक्षणं दिसताच कोणता आजार आहे ते ओळखणं होईल सोपं

मुंबईपासून सूरतपर्यंत बाजारपेठ

फक्त उत्पादन घेऊन उपयोग नाही त्याला बाजारपेठं मिळणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. या ड्रॅगन फ्रुटला मुंबई, वाशी आणि नाशिकमध्ये मोठी मागणी आहे. याशिवाय याची निर्यात सुरतला देखील केली जाते.

शेतीसोबत नर्सरीही केली सुरू

ड्रॅगन फ्रुटच्या यशस्वी शेतीनंतर सरला चव्हाण यांनी 'श्रीराम ड्रॅगन फ्रुट फार्म' या नावाने नर्सरी देखील सुरू केली. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुटचा प्रयोग करणे शक्य होईल.

सरला चव्हाण या महिला शेतकऱ्याची कहाणी फक्त ड्रॅगन फ्रुटच्या शेतीची नाही तर पारंपारिक सोबतच विदेशी पिकाचे उत्पन्न आपल्या मातीत करण्याची जिद्द आहे. पारंपारिक पिकांमधून वेगळा मार्ग निवडला त्याचा अभ्यास केला आणि मेहनतीने यशस्वी करून देखील दाखवला .

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com