Rules Changing From 1st May 2023: एप्रिल महिना संपायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बरेच बदल होतात. १ मे पासून अनेक बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. या महिन्यात कोणते नियम (Rules) बदलणार आहे याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.
एलपीजी आणि सीएनजीच्या (Lpg and Cng Price Today) किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट केल्या जातात. 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,028 रुपये झाली होती. यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. १ मे पासून काय बदल होणार आहेत ते पाहूया. (Latest Marathi News)
म्युच्युअल फंडाचे नियम बदलतील
SEBI ने म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जे 1 मे 2023 पासून लागू होतील. नवीन नियमानुसार आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी वॉलेट आरबीआयच्या केवायसीशी जोडावे लागेल.
जीएसटीचे नियम बदलतील
1 मे 2023 पासून प्रत्येक व्यावसायिकाने नवीन GST नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. या नवीन नियमानुसार, आता 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकाला त्याच्या व्यवहाराची पावती IRP वर म्हणजेच इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर व्यवहाराच्या 7 दिवसांच्या आत अपलोड करावी लागेल. अंतिम मुदतीनंतर पावती अपलोड केली जाणार नाही.
बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना दिलासा
१ मे पासून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे नियमही बदलणार आहेत. आता या वाहनांवर परमिट शुल्क आकारले जाणार नाही. जो मोठा दिलासा आहे.
एटीएम व्यवहारावर शुल्क आकारले जाईल
हा नियम देखील 1 मे पासून सुरू होणार आहे. हा नियम नुकताच PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकने लागू केला आहे. आता ज्यांचे या बँकेत खाते आहे आणि ते एटीएममधून व्यवहार करतात, परंतु त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही, तर बँक ग्राहकांवर एटीएम व्यवहार शुल्क आकारेल. हे शुल्क 10 रुपये + GST किंमत असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.