रॉयल एन्फिल्ड बाईकच्या उत्पादनातील लोकप्रिय कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन बाईक लाँच करत असते. कंपनी आता नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक म्हणजे Himalayan 452.
याआधी कंपनीने या बाईकचा टीझर लाँच केला होता. त्यानंतर आता या बाईकची संपूर्ण माहिती समोर आली आहे. रॉयल एन्फिल्डच्या या बाईकमध्ये नवीन अपडेट्स देण्यात आले आहे.
कंपनीच्या आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ही नवीन कार पूर्णपणे वेगळी आहे. या नवीन बाईकच्या मडगार्डवर हिमालयन ब्रँडिंग आहे. याचसोबत इंधनाची टाकी, साइड पॅनल, आणि मागे हिमालयन ग्राफिक्स देण्यात आले आहे.
फिचर्स
रॉयल एन्फिल्डच्या नवीन हिमालयन 452 मध्ये नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यात बीक फेंडर, एका हाई सेट-एलईडी हँडलॅम्प, एक मोठी इंधनाची टाकी आणि स्लिप्ट सीटसह पेटिट टेल सेक्शन देण्यात आले आहे. या बाईकला वायर स्पोक व्हिलसह 21 इंच आणि 17 इंचची व्हिल देण्यात आले आहे. ही बाईक उत्तम ऑफरोडिंगसाठी प्रसिद्ध आहे. ऑफ रोडिंगच्या या बाईकमध्ये नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे.
रॉयल एन्फिल्डने या बाईकबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीक झालेल्या माहितीनुसार,कंपनी या बाईकमध्ये 451.65cc लिक्विड कूल्ड इंजिन वापरणार आहे. हे इंजिन 39.45 bhp पॉवर जनरेट करेल. या नवीन बाईकची लांबी या बाइकची लांबी अंदाजे 2,245 मिमी, रुंदी 852 मिमी आणि उंची 1315 मिमी असेल. ही बाईक आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी असेल. ह
किंमत आणि लाँच तारीख
बाईकच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. एका रिपोर्टनुसार, या बाईकची किंमत 2.70 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही बाईक बाजारात KTM 390 Adventure, BMW G 310 GS आणि Yezdi Adventure या मॉडेल्सशी स्पर्धा करेल. ही बाईक 7 नोव्हेंबरला लाँच होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.