PM Street Vendors Scheme :सरकारकडून बिनव्याजी कर्ज, ७ टक्के सबसिडीही मिळणार, योजनेचा लाभ कसा घ्याल?

Government Scheme: सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते.
PM Street Vendors Scheme
PM Street Vendors SchemeSaam Tv
Published On

Government Scheme For Street Vendor:

सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. शेतकरी, सामान्य नागरिक, बिझनेस अशा सर्व लोकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. कोरोना काळात सरकारने अनेक योजना राबवल्या त्यातील एक योजना म्हणजे पीएम स्वानिधी योजना (स्ट्रीट वेंडर सेल्फ रिलेंट फंड).

ही योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या योजनेत अटी व नियंमाचे पालन केल्यास कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. या योजनेत सरकार तुम्हाला सबसिडी देईल. या कर्जाचा लाभ रस्त्यावरील विक्रेते घेऊ शकता. या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता हे जाणून घेऊया.

PM Street Vendors Scheme
AI : AI मुळे भविष्यात विजेची मागणी वाढणार, रिपोर्ट्समधून काय आलं समोर?

पीएम स्वानिधी योजना

पीएम स्वानिधी योजना रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देते. ही योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. रस्त्यावरील विक्रेत्यांना हमीशिवाय 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते. या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर तिसऱ्यांदा 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

सरकारचे 7टक्के अनुदान

या योजनेअंतर्गत तुम्ही वेळेवर कर्ज भरल्यास तुम्हाला 7 टक्के अनुदान मिळेल. ही रक्कम 400 रुपये असून पैसे तुमच्या जनधन खात्यात जमा होतील. तसेच डिजिटल व्यव्हार केल्यास तुम्ही प्रति वर्ष 1,200 रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळवू शकता.

आतापर्यंत अनेक विक्रेते लाभार्थी

अलीकडे सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार या योजनेत 50 लाख विक्रेते सामील झाले आहे. यात 65.75 लाख कर्ज वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत 1,33,003 कोटी रुपयांचे तर 113.2 कोटीहून अधिक डिजिटल व्यव्हार झाले आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांना 58.2 कोटींचा कॅशबॅक मिळाला आहे.

PM Street Vendors Scheme
Cardiac Arrest Symptoms : झोपेत कार्डियक अरेस्टचा झटका कसा येतो? ही ५ लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com