सध्या जगात लाखो लोक एआयचा वापर करतात. एआयमुळे अनेक कामे सोपी होतात. परंतु आता एआयसंबंधित मोठी माहिती समोर आली आहे. एआयच्या वापरामुळे सर्वात जास्त वीज वापरली जाणार असल्याचं एका संशोधनात सिद्ध झालं आहे.
एका संशोधनुसार, AI मुळे अनेक बदल होऊ शकतात. एआयच्या वापरांमुळे वीजेचा वापर वाढू शकतो. हा वीजेचा वापर जवळपास एका देशाच्या वार्षिक उर्जेच्या मागणीपेक्षा जास्त असेल. नेदरलँड, अर्जेंटिना आणि स्वीडन सारख्या देशांचा समावेश आहे.
कारण काय?
एका रिपोर्टनुसार, AI चा वापर करण्यासाठी ChatGPT सारख्या अॅपच्या मदतीने डेटा कलेक्ट करता येऊ शकतो. याबाबतीतचा विकास २०२२ पासून सुरु आहे. हे करण्यासाठी AIला खूप जास्त प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. एआयसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा पुरवणे आवश्यक असते. त्यामुळे विजेचा जास्त प्रमाणात वापर होतो.
न्युयॉर्क आधारित AI कंपनीच्या अहवालानुसार, टेक्स्ट कंटेट तयार करण्यासाठी एआय टूल्सला प्रशिक्षण द्यावे लागते. यासाठी 43 मेगा वॉल्ट (MWH)वीज वापरली जाते. ही वीज जवळपास एका वर्षात अमेरिकेतील 40 घरांना वीज पुरवते. एआयचे काम मोठ्या प्रमाणात कम्प्यूटरवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सिग्नलवर आधारित टेक्स्ट किंवा फोटो तयार करावा लागतो.
एका रिपोर्टनुसार, ChatGPTचा वापर केल्यास रोज 564 मेगावॅट विजेचा वापर होतो. जर गुगल एका दिवसाला 9 अब्जाहून अधिक सर्चवर काम करत असेल तर ते AI सारखेच चालते. त्यामुळे दरवर्षी TWh विजेची गरज भासेल, जी आयलँडच्या वार्षिक विजेच्या वापराच्या जवळपास आहे. एआयची सध्या खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.