Health News: मुंबईत बालकांमध्ये वाढतोय कॉक्ससॅकी व्हायरसचा धोका; काय आहेत याची लक्षणं?

Health News: मुंबईत कॉक्ससॅकी हा संसर्गजन्य आजारामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय. या व्हायरसमुळे कांजिण्यांसारखे हाता पायावर फोड येण्याची समस्या जाणवते.
Health News
Health Newssaam tv
Published On

पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा विळखा वाढतो. मात्र आता पावसाचे दिवस गेल्यानंतर देखील एक संसर्गजन्य आजार वेगाने पसरताना दिसतोय. मुंबईत कॉक्ससॅकी हा संसर्गजन्य आजारामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय. या व्हायरसमुळे हात-पायावर फोड येण्याची समस्या जाणवते. खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसू येऊ शकते.

कॉक्ससॅकीमुळे हात, पाय आणि तोंडावर पुरळ येऊ शकतात. हे फोड वेदनादायक अल्सरमध्ये बदलत असल्याने मुलांना खाण्यापिण्यातही त्रास होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या बालकांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना या संसर्गाचा परिणाम भोगावा लागू शकतो. याशिवाय या समस्येदरम्यान ताप, घसा खवखवणे आणि हात, पायासह तोंडावर लहान फोड किंवा पुरळ येऊ शकतात.

Health News
Uterus cancer symptoms: गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात महिला, शरीरात 'हे' बदल दिसेल तर वेळीच व्हा सावधान

कसा पसरतोस हा व्हायरस?

खोकला, शिंकणं किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग पसरतो. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींना याची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. यावेळी खासगी रुग्णालयात दररोज तीन ते चार रुग्ण आढळून येतायत. मात्र पालिकेच्या रुग्णालयांत एकही रुग्णांची नोंद झाली नसल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालीये.

यासंदर्भात बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. बी. श्रीकांत यांनी सांगितलं की, यापूर्वी सहा वर्षांखालील मुलांपुरता पूर्वी हा आजार मर्यादित होता. परंतु आता ६ ते १२ वयोगटातील मुलांनाही याचा संसर्ग होताना दिसतो. या संसर्गाने संक्रमित मुलांमुळे हा आजार इतरांना होऊ शकतो. अशा परिस्थितीत पालकांनी बाधित मुलाला किमान आठवडाभर तरी शाळेत पाठवणं टाळलं पाहिजे.

काय आहेत याची लक्षणं?

या व्हायरसची लक्षणं दिसून येण्यासाठी तब्बल ३६ दिवस लागतात. बऱ्याचदा या व्हायरसमुळे रुग्णाला पुरळ आणि ताप येऊ शकतो. चिकनपॉक्समध्ये रुग्णाच्या छाती, पाठीवर फोड येण्याचा अधिक धोका असतो. त्याचप्रमाणे अतिसार आणि पोटात दुखणं ही लक्षणं आढळून येतात.

Health News
Heart Attack Symptoms : केवळ छातीतील वेदनांना हार्ट अटॅकचं लक्षण समजू नका; शरीराच्या 'या' भागातील वेदनाही असतात संकेत

याशिवाय कॉक्ससॅकीमुळे बोटं, तळवे, गुडघे, नितंब, हात आणि शरीराच्या सांध्यामध्ये फोड येतात. पीसीआर चाचणीनंतर या संसर्गाचं निदान होतं. वैयक्तिक स्वच्छता ठेवल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com