गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीला हिंदू धर्मात अधिक महत्त्व आहे. ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. या सणात सात ऋषीबद्दल आदर व्यक्त केला जातो.
यंदा ऋषीपंचमी ही २० सप्टेंबरला साजारी केली जाईल. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे असून या दिवशी ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. या दिवशी कांदा-लसूण न वापरता भाजी बनवली जाते. जाणून घेऊया पौष्टिक आणि चविष्ट पद्घतीने भाजी कशी बनवायची
1. साहित्य
२-३ चमचे तेल (Oil)
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१० चिरलेली अळूची पाने
१ कप बारीक केलेली अरवी
१ कप रताळ्याचे काप
५-६ भेंडीचे तुकडे
१ कप कच्च्या केळीचे (Banana) तुकडे
१ कप अळूचे देठाचे तुकडे
१ कप सुरणचे तुकडे
१ कप भोपळ्याचे तुकडे
१ कप शिराळीचे तुकडे
१ कप लाल माठ
१ कणीस (Corn)
१ कप भिजवलेले शेंगदाणे
१ कप ओलं खोबरं
मीठ
हळद
2. कृती
सर्वप्रथम पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची घाला.
नंतर सर्व भाज्या एकत्र करुन घाला. मीठ आणि किसलेले खोबरे घालून चांगले ढवळून घ्या.
थोडे पाणी घालून झाकण ठेवून १० मिनिटे भाजी चांगली शिजू द्या.
१० मिनिटानंतर झाकण काढून चांगले ढवळून घ्या. हळद आणि मीठ घालून पुन्हा ढवळा
पुन्हा ५ मिनिटे भाजी झाकून ठेवा आणि चांगल्याप्रकारे शिजू द्या.
तयार भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.