FAME 2 Scheme : फेम 2 स्कीममध्ये मोठा बदल! इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना मिळणार इतकी सबसिडी, जाणून घ्या

Electric Vehicle : भारत सरकार EV वापरकर्त्यांना 'फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स' म्हणजेच FAME-2 योजनेअंतर्गत सवलत देते.
FAME 2 Scheme
FAME 2 SchemeSaam Tv
Published On: 

FAME 2 Scheme For EV : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना लोक पर्यायी मार्ग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळाले आहेत. अशा वेळी देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे. तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीलाही प्रोत्साहन देत आहे. भारत सरकार EV वापरकर्त्यांना 'फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स' म्हणजेच FAME-2 योजनेअंतर्गत सवलत देते. तुम्हालाही भविष्यात ईव्ही खरेदी करायची असेल, तर तुम्हाला त्यावर सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

काय आहे FAME-2 सबसिडी?

FAME-2 सबसिडी गेल्या वर्षीपासून लागू आहे आणि ती पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. याद्वारे ग्राहकांना दिला जाणारा लाभ सुरुवातीला 10000 रुपये प्रति kWh इतका निश्चित करण्यात आला होता. परंतु जून 2021 मध्ये सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मर्यादा 15,000 रुपये प्रति kWh पर्यंत वाढवली.

FAME 2 Scheme
FAME Scheme : ऑटो मोबाईल कंपन्या घेताय गैरफायदा ? काय आहे फेम योजना ? सरकार करणार का वसुली

इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे काय फायदे आहेत?

Ather 450 Plus (Ather 450 इलेक्ट्रिक स्कूटर) ची मुंबई एक्स-शोरूम किंमत 1,71,520 रुपये आहे. तुम्ही Ather 450 Plus खरेदी केल्यास, भारत सरकार तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 43,500 रुपयांची सूट देईल. त्यामुळे तुम्हाला या स्कूटरसाठी केवळ 1,28,020 रुपये मोजावे लागतील.

इलेक्ट्रिक वाहन (Vehicle) खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार FAME-2 अनुदानाचा लाभ देत आहे. हे अनुदान ग्राहकांना खरेदीच्या वेळीच मिळणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या लाभांव्यतिरिक्त, विविध राज्ये इलेक्ट्रिक वाहनांवर वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.

यापूर्वी किती अनुदान मिळाले?

सध्या भारतीय बाजारपेठेत ईव्हीच्या विक्रीत वाढ झाली आहे, या सर्व ग्राहकांना या योजनेअंतर्गत सूट मिळत आहे. मात्र, जूनपासून सरकारने अनुदानात कपात केली आहे. यापूर्वी, सरकार दुचाकींसाठी प्रोत्साहन म्हणून 15,000 रुपये प्रति किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी आणि वाहनाच्या किंमतीच्या 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देत होते.

FAME 2 Scheme
Government Scheme : Aadhaar-Pan लिंक असो वा Birth Certificate... आता सगळी कामं 'या' एकाच वेबसाईटवर

भारत सरकारने 'फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड (Hybrid) अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME-II) स्कीम' मध्ये दुचाकी E-V वर 50 टक्के अधिक प्रोत्साहन दिले होते. मात्र आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया यावेळी नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर किती सूट दिली जात आहे.

आता नवीन ईव्ही खरेदीवर किती सबसिडी?

सरकारने 1 जून 2023 रोजी किंवा त्यानंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असलेल्या FAME-II (फास्टर अॅडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान कमी केले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने हे बदल सूचित केले आहेत.

FAME 2 Scheme
EV Care Tips in Monsoon : इलेक्ट्रिक बाइक वापरताय? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी मागणी प्रोत्साहन रुपये 10,000 प्रति kWh असेल. म्हणजेच, जर तुम्ही आधी 3 kW ची EV विकत घेतली असती तर तुम्हाला 45,000 रुपयांची सूट मिळाली असती, जी आता 30,000 रुपयांवर आली आहे. एकूणच, तुम्हाला 3 kW EV साठी 15,000 रुपये जास्त द्यावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.