प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण (Republic Day Of India) आहे. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली होती. 26 जानेवारी रोजी दिल्लीत कर्तव्यपथावर परेडचं आयोजन केलं जातं. या परेडमध्ये देशाच्या सैन्य दल, नौदल आणि हवाई दलही सहभागी होतात. देशाचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. त्यासोबत 21 तोफांची सलामीही दिली जाते. यावर्षी आपण भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. (Latest News)
भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने बनवलं होतं. त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यामुळे दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दुसऱ्या राष्ट्राच्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात (Republic Day) सहभागी होणारे पहिले प्रमुख पाहुणे 1950 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो होते. प्रजासत्ताक दिन परेडची सुरुवात 1950 मध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना लागू झाल्यापासून झाली. 1950 ते 1954 पर्यंत प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथावर न होता चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 1955 पासून राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Pared) सुरू झाली. तेव्हापासून दरवर्षी 26 जानेवारीला येथे कार्यक्रम होऊ लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी कर्तव्यपथाचे उद्घाटन केलं. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात, त्याला राजपथ असं म्हटलं जायचं. त्याचं नाव बदलून आता कर्तव्यपथ असं करण्यात आलंय. कर्तव्यपथाची एकूण लांबी तीन किमीपेक्षा जास्त आहे.
21 तोफांची सलामी
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवतात, तेव्हा 21 तोफांची सलामी दिली जाते. भारतीय लष्कराच्या तोफांमधून ही सलामी दिली जाते.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठीचे चित्ररथ संरक्षण मंत्रालयाच्या समितीद्वारे निवडली जाते. दरवर्षी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून चित्ररथासाठी सूचना मागवल्या (Republic Day Pared) जातात. त्यानंतर सर्व राज्ये आपल्या सूचना पाठवल्यानंतर समिती त्यावर चर्चा करते. त्यानंतरच निवड केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.