Jio Network Down News: देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रिलायन्स जिओची (Reliance Jio) नेटवर्क सेवा आज सकाळी ६ वाजल्यापासून ते सकाळी ९ वाजेपर्यंत असे तीन तास जिओचं नेटवर्क डाऊन होतं. यामुळे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्स सेवा विस्कळीत झाली. एवढंच नाही तर, टेक्स्ट मेसेजेस पाठवायला आणि OTP यायलाही अडचणी येत होत्या. (Jio Outage News)
रिलायन्स जिओला आजच्या सुरूवातीला आउटेजचा सामना करावा लागला आणि अनेक जिओ ग्राहकांना कॉल्स करण्यात आणि कॉल स्विकारण्यात अडचणी आल्या. इतकेच नाही तर एसएमएस सेवाही वापरता येत नव्हती. आज, २९ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजल्यापासून देशभरातील ते सकाळी ९ वाजेपर्यंत हा आउटेज होता. (reliance jio network down)
मागील काही आउटेजेसच्या तुलनेत, यावेळी नेटवर्क सेवेच्या तीन तासांच्या व्यत्ययामुळे बहुतेक जिओ ग्राहकांना मोबाइल इंटरनेट डेटा सेवा योग्यप्रकारे कार्यरत होती. फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा प्रभावित झाली. या आउटेजची तक्रार करण्यासाठी अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर ट्विट केलं आहे. आउटेजमुळे, विविध प्लॅटफॉर्मवर टू-स्टेप व्हेरिफिकेशनसाठी जिओ वापरकर्त्यांना OTP मिळायलाही अडचणी आल्या.
नेटवर्क सेवा डाउन झाल्याबद्दल जिओने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आता अडचणी दूर झाल्या आहेत. नेटवर्क डाउन होण्याचेमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वर्षभरात अशाच प्रकारची आउटेज अनेक वेळा नोंदवली गेली. याआधी ग्राहकांनी 2022 च्या ऑक्टोबर, जून आणि फेब्रुवारीमध्ये डेटा वापरण्यात आणि कॉल करण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नोंदवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.