
Relationship Tips : हल्ली तरुण पिढीमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणे ही सामान्य बाब झाली आहे. प्रेमात पडलेले प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपण तिला किंवा त्याला इम्प्रेस करण्यासाठी काही तरी करायला हवे.
प्रेमबंधनात अडकलेल्या प्रत्येकाला आपले नाते जपावे, टिकावे व तितकेच ते फुलावे असे वाटते. आपल्या मैत्रिणीच्या किंवा आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत आपण चांगले दिसावे किंवा आपली इमेज निर्माण करण्याच्या नादात तो बऱ्याच अशा अनेक चुका करतो ज्यामुळे त्याला नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
भविष्यात तुमचे नाते कसे असेल, हे मुख्यत्वे तुम्ही सुरुवातीच्या काळात मैत्रिणीशी कसे वागता यावर अवलंबून असते. आम्ही असे म्हणत नाही की गर्लफ्रेंडने विशेष वाटू नये, परंतु तिच्या स्वतःच्या काही कृतींमुळे तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. व त्याचा पश्चात्ताप आयुष्भर सहन करावा लागू शकतो. (Latest Marathi News)
1. सर्व गोष्टींचा स्वीकार करणे
प्रेमाच्या नात्यात (Relation) पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटू लागते की, ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सर्व गोष्टी स्वीकरणे मग त्या चांगल्या असू देत किंवा वाईट. कुठेतरी तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीच्या हो मध्ये हो तर मिसळत नाही ना. डोळे बंद करून सर्व काही ऐकले तर नाते फार काळ टिकणार नाही. यामुळेच प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. जर तुम्ही तिची सवय आतापासून खराब केली तर नंतर ती तुमची योग्य गोष्ट स्वीकारणार नाही.
2. जास्त खर्च करणे
सहसा जेव्हा एखादा पुरुष (Man) प्रेमात पडतो तेव्हा त्याला त्याच्या प्रेयसीच्या खरेदीपासून ते रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्यापर्यंतचा सर्व खर्च उचलावा लागतो, बहुतेक मुलं बिल भरतात. प्रेयसीला इम्प्रेस करण्याच्या प्रकरणात तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुमच्या जोडीदाराला उघडपणे सांगा, पैसे खर्च करणे नेहमीच योग्य नसते.
3. सतत चिकटून राहाणे
प्रेयसीच्या जवळ राहण्याची इच्छा कोणाला नसते, परंतु नेहमी चिकटून राहणे चांगले नाही, कारण सुरुवातीला तुम्हाला आणि तुमच्या प्रेयसीला ते खूप आवडेल, परंतु तुम्ही हे काम फार काळ करू शकणार नाही, कारण कालांतराने तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. ज्यामुळे तुम्हाला आपल्या नात्याला पुरेसा वेळ देता येत नाही. कदाचित भविष्यात तुमचा जोडीदार म्हणेल की तुम्ही आता पूर्वीसारखे नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.