Sabudana Batata Chakali Recipe
Sabudana Batata Chakali RecipeGoogle

Recipe: उन्हाळ्यात वाळवणासाठी बनवा कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली; रेसिपी पाहा

Sabudana Batata Chakali :उन्हाळा सुरु झाला की घराघरात वाळवणाची तयारी होते. त्यासाठी घराघरात पापड, साबुदाण्याची चकली असे अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा बटाट्याची कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.
Published on

Sabudana Batata Chakali Recipe In Marathi:

उन्हाळा सुरु झाला आहे. बाहेर कडकडीत ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी वाळवण करण्यास सुरुवात झाली आहे. गृहिणींचा वाळवणासाठी तयारी सुरु झाली आहे. घराघरात पापड, कुरड्या, बटाट्याचे वेफर्स, किस, तांदळाचे पापड बनवले जातात. यासाठी पुरेसं ऊन आवश्यक असतात. त्यामुळे या दिवसातच वाळवण तयार केली जातात.

उन्हाळ्यात तयार केलेली ही वाळवण वर्षभर टिकतात. यामध्ये उपवासाची साबुदाणा, बटाटा चकली तयार केली जाते. ही चकली वर्षभर चांगली राहते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही चकली आवडीने खातात. याच साबुदाणा बटाटा चकलीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Latest News In Marathi)

साम्रगी

Sabudana Batata Chakali Recipe
Spinal Muscular Atrophy : स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी आजार कसा होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कृती

  • सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ६ कप वाटी पाणी गरम करुन घ्या.

  • साबुदाण्यामध्ये गरम पाणी टाका आणि काही तास हे साबुदाणे तसेच ठेवा.

  • यानंतर कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवा. बटाटे शिजल्यावर त्याची साल काढून किसून घ्या.

  • बटाट्यांमध्ये भिजवलेला साबुदाणा, लाल तिखट, मीठ टाकूण सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या.

  • हे सर्व मिश्रण चकली बनवण्याच्या साच्यामध्ये टाका आणि चकल्या पाडून घ्या.

  • या चकल्या उन्हात वाळवून घ्या. चकली वाळली की ती तळून पाहा. ही चकली तुम्ही खाऊ शकता.

  • ही साबुदाणा, बटाट्याची चकली खाण्यासाठी अतिशय चविष्ट असते. ही चकली तुम्ही वर्षभर बंद डब्यात ठेवू शकता.

Sabudana Batata Chakali Recipe
Anemia Disease : ९० टक्के तरुणी, मुलांनामध्ये लोहाची कमतरता, कशी घ्याल काळजी? डॉक्टरांनी दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com