Success story: रश्मीची थक्क करणारी स्टोरी, डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही!

पालकांच्या प्रयत्नामुळे रश्मीला पनवेलमधील श्रृतक्षम मुलांच्या शाळेत प्रवेश घेता आला. अतीतीव्र कर्णबधिरता असल्यामुळे रश्मीला श्रवणयंत्राचा फारसा उपयोग होत नसे.
Success story
Success storysaam tv
Published On

सुरेश आणि अर्चना पाटील यांची पहिली मुलगी रश्मी. जन्मानंतर काही दिवसातच तिला ऐकू येत नाही हे आईवडिलांच्या लक्षात आलं. कानाच्या तपासणीनंतर अतीतीव्र कर्णबधीरता ( Profound Heaning ) असल्याचं निदान झालं. आणि मग तिचा आणि तिच्या आईचा एक नवा प्रवास सुरु झाला जिद्दीचा.. मेहनतीचा !!! रश्मीने आग्रीपाड्याच्या 'द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ' या विशेष शाळेचे शाळेत भाषेचे आणि वाचनाचे प्राथमिक घडे घेतले. पनवेल ते सॅण्डहर्स्ट रोड आणि उलटे भायखळा असा रश्मीचा रोजचा दिनक्रम आईबरोबर सुरु झाला. या प्रवासात अनेकांचे टोमणे, विचित्र सहानुभूती, असे अनुभव आले, मात्र आई खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. शिक्षण घेताना समोरच्याच्या ओठांच्या हालचालीवे बोलणं समजून (lip reading) घेऊ लागली. मोठ्या कष्टाने तिने १२ वी पूर्ण केली.

सहाव्या वर्षी भरतनाट्यम शिकण्यासाठी आईने तिला क्लासला घातलं. तिथे प्रवेश घेताना अडचण होतीच की ऐकूच येत नाही, मग शब्द ठेका कानावर पडणार कसा आणि त्याशिवाय नाचणार कशी? त्यातच रश्मीला तीव्र अर्थशीशी सुरु झाली. भरीस भर म्हणून कमी रक्तदाबाचा त्रासही सुरु झाला. याचा परिणाम शिक्षणावर झाला. सगळ्या अडचणींवर मात करत, आईचे अथक प्रयत्न, बाबांचा भक्कम पाठिंबा या बळावर रश्मी एक एक पाऊल यशाकडे टाकत होती. नृताच्या क्लासमधे शिकवलेले तिला समजत नव्हतं. रश्मीची आई, तिच्यासोबत क्लासमध्ये बसत होत्या. शिकवलेली प्रत्येक गोष्ट समजून घेत होत्या. यावेळी आवश्यक ते व्हिडीओ काढत होत्या. घरी आल्यावर त्या पुन्हा रश्मीकडून सराव करुन घ्यायच्या.

रश्मीच्या आईला शास्त्रीय नृत्य अजिबात येत नव्हते. पण लाडक्या लेकीसाठी त्यांनी सगळं शिकून, भरतनाट्यमचा परिपूर्ण अभ्यास केला. मेरी मॅक मोहन पॉल - या रश्मीच्या भरतनाट्यमच्या गुरु आहेत. अमराठी असल्या तरी, त्या जमेल त्या शब्दांतून रश्मीशी प्रेमळ संवाद साधतात. हावभावांच्या सहाय्याने आणि आईच्या तीव्र ईच्छाशक्ती मुळे रश्मी भरतनाट्यम शिकली.

विशेष प्रशिक्षण संपवून वयाच्या १२ व्या वर्षी, रश्मी 'अरंगेत्रम' साठी मुंबईतील मोठ्या सभागृहासह प्रेसकांसमोर उभी राहिली. यावेळी प्रेक्षकांनीही दाद दिली. पण जेव्हा त्यांना कळलं की, ही नृत्यांगना ऐकू शकत नाही, तेव्हा संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला. जणू त्या टाळ्यांनी रश्मीच्या प्रयत्नांना, जिद्दीला अभिवादन केलं. भरतनाट्यमच्या सहा परिक्षा ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून पूर्ण केल्या आहेत. पुढे तिने अॅडव्हान्स कोर्सही पूर्ण केला आहे. रश्मीला नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे तिने योगसूत्र पदविकेचा अभ्यासही केला.

Success story
Success story: दिव्यांग असूनही नताशा जोशीने जग जिंकलं; प्रेरणादायी कहाणी वाचून थक्क व्हाल

रश्मीला अनेक मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. २०१४ ला निला रायगड भूषण घ पुरस्कार मिळाला. डिसेंबर २०१४ ला बालरोगतज्ज्ञ राष्ट्रीय परिषदेची सुरूवात रश्मीच्या नृत्याने केली गेली. २०१७ ला तिला 'यंग आंत्रेपेनिअर अॅवार्ड' हा पुरस्कार मिळाला. शिमला येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत तिला 'विशेष नृत्यांगना’ म्हणून सन्मानीत करण्यात आले.

ह्युमॅनिटी फर्स्ट फांऊंडेशन पुरस्काराने रश्मीचा गौरव करण्यात आला आला आहे. ८ जानेवारी 2020 ला Mister and Miss Indus स्पर्धेत भाग घेऊन तिला इंटरनॅशनलचा "वूमन् ऑफ सबस्टन्म" आणि 'मिस इंडस् मोस्ट टॅलेन्टेड अॅवार्ड'ने भूषवण्यात आलं. 'घुंगरु 2020' या सुप्रसिद्ध फेस्टिव्हलमधे रश्मीला विशेष प्रतिनिधी म्हणून सन्मानाचे निमंत्रण मिळालं. VIBGYOR फॅशन शो मध्ये रश्मी सहभागी झाली आहे.

We Embrace Foundation - कॅलिफोर्निया ने आयोजित केलेल्या online कार्यक्रमात रश्मी सहभागी झाली आहे.

World Disability Day निर्मित झालेल्या कार्यक्रमान पद्मभूषण डॉ. सुब्रमण्यम यांनी तिचे विशेष कौतुक केले. २०२२ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रश्मीला मिळाला आहे. 'गुगल इंडिया' ने तिची मुलाखत घेतली आहे.

Success story
Success story: दिव्यांग असूनही तो हरला नाही...! आपल्यासारख्याच इतरांसाठी उभारलं दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पाहा पारस यांची यशोगाथा

या सारखे अनेक अनेक मानसन्मान मिळालेल्या रश्मीला दिल्लीतील पर्पल फेस्टिवलमध्ये, राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती महोदया यांच्यासमोर नृत्य सादर करण्यासाठी खास निमंत्रण मिळालं. रश्मी नृत्य करत असताना, समोर तिची आई हावभाव आणि ओठांच्या घालचाली करुन तिला बोल समजून सांगत होनी. डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रृंसह ! प्रेक्षागृह थक्क होऊन पाहत होते. आणि तिच्या यशस्वी कारकीर्दीचा मानाबिंदु होता. रश्मी आणि तिच्या आईचे कौतुक करताना शब्दही निःशब्द होतात ... सलाम !!!

Success story
Success story: अपंगत्व आणि दृष्टीदोष असूनही रूपेशने पूर्ण केली स्वतःची स्वप्नं; पाहा त्याची यशोगाथा

नुतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com