Mpox test kit: झटपट आणि कमी खर्चिक! लवकरच बाजारात येणार भारतातील पहिलं Mpox रॅपिड टेस्ट किट

Mpox test kit: मंकीपॉक्सचे आतापर्यंत ३ रूग्ण आढळून आल्याची माहिती आहे. याचं निदान वेळेत व्हावं यासाठी भारतात लवकरच पहिली मंकीपॉक्सचं रॅपिड टेस्ट किट बाजारात येणार आहे.
Mpox test kit
Mpox test kitsaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून मंकीपॉक्सने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील मंकीपॉक्सचा रूग्ण आढळल्याने केंद्र सरकार अलर्ट मोडवर होतं. अशातच मंकीपॉक्सचं निदान होण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत होतं. नुकतंच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (ICMR-NIV) द्वारे विकसित केलेली एक नवीन मंकीपॉक्सची रॅपिड टेस्ट कीट बाजारात येणार आहे. या नव्या टेस्ट किटमुळे मंकीपॉक्स (Mpox) चा खर्च आणि वेळ दोन्ही 60-70% कमी होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या टेस्ट कीटची किंमत 350 ते 400 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या कीटद्वारे केवळ फक्त एका तासात निकाल हाती लागणार आहे.

Mpox test kit
Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

टाइम्स ऑफ इंडियाला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड टेस्टमध्ये LAMP (लूप मेडिएटेड आयसोथर्मल ॲम्प्लीफिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये RT-PCR सारख्या महागड्या मशीन किंवा विशेष कौशल्याची आवश्यकता नसते.

गेल्या आठवड्यात, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ॲबॉटद्वारे उत्पादित आणीबाणीच्या वापरासाठी Mpox शोधण्यासाठी रिअल-टाइम पीसीआर चाचणी मंजूर केली. याउलट, ICMR-NIV किट गेम चेंजर बनणार आहे.

ICMR-NIV अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्याच्या पीसीआर टेस्टसाठी सुमारे 600 ते 800 रुपये खर्च येतो. शिवाय यासाठी 25 लाख रुपयांच्या मशीनची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे याचा वेळ खर्ची होत असून प्रक्रियेसाठी चार तास लागतात. नवीन किटची किंमत लक्षणीयरीत्या कमी असणार आहे. महागड्या उपकरणे किंवा खास कर्मचाऱ्यांशिवाय परिणाम जलद देणार आहे.

ICMR-NIV चे डॉ. श्याम सुंदर नंदी यांनी NIV च्या मुंबई युनिटमध्ये या LAMP-आधारित तंत्रज्ञानाचं नेतृत्व केलं होतं. पुण्यातील BSL-4 लॅबमध्ये याचं टेस्टिंग केलं गेलं. अधिकाऱ्याने सांगितलं की, भारतात विकसित केलेली हे पहिलं Mpox डिटेक्शन किट आहे. ICMR ने विशेष अधिकार सुरक्षित करण्यासाठी पेटंटसाठी अर्ज केला आहे.

Mpox test kit
Prediction Of Death: कधी आणि कसा होणार मृत्यू? डॉक्टरांनी तयार केलं मृत्यूचं अचूक भाकीत करणार टूल

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसत होती. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट 2024 रोजी Mpox ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न (PHEIC) घोषित केलं. दरम्यान भारतात देखील याचे तीन रूग्ण आढळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com