
मधुमेह ही आजच्या काळात एक सामान्य समस्या बनली आहे. जगभरातील मोठ्या संख्येने लोक या आजाराने ग्रस्त आहेत. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, शारीरिक हालचालिचा अभाव या सर्व गोष्टींमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जेव्हा तुमचे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करत करु शकत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर किंवा ग्लुकोजची पातळी वाढते. तेव्हा मधुमेह होतो. रक्तातील अतिरिक्त साखर नंतर मधुमेहामध्ये बदलते. मधुमेहासोबतच प्री-डायबेटिजमध्येही रुग्णाला आहाराची अधिक काळजी घ्यावी लागते.
प्री-डायबेटिस ही अशी स्थिती आहे जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते, परंतु टाइप 2 मधुमेहाची पातळी मर्यादेपर्यंत नसते. परंतु प्री- डायबिटीजच्या बाबतीत जर बदल केले नाहीत, तर मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला प्री-डायबिटीज असल्याचे आढळून आले तर तुम्ही तुमच्या आहारातून काही पदार्थ काढून टाका.
मिठाई किंवा गोड पदार्थ
जर तुम्हाला प्री-डायबिटीज असल्याचे आढळून आले, तर सर्वप्रथम साखरेचे सेवन कमी करण्यावर भर द्या. केक, मिठाई, कुकीज, कँडीज, स्नॅक्स,प्रोसेस्ड फूड्स, केचअप, जेली इत्यादी भरपूर साखर असलेल्या गोष्टी खाणं टाळा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
शुगर ड्रिंक्स
साखरयुक्त पेय पिणे टाळा. साखरयुक्त पेये रक्तातील साखर वाढवतात. कारण त्यात प्रथिने किंवा चरबीसारखे इतर पोषक घटक नसतात. त्यामुळे दारू, एनर्जी ड्रिंक्स, फळांचा रस, लिंबूपाणी, गोड चहा, गोड कॉफी, सोडा इत्यादी टाळण्याचा प्रयत्न करा. यामुळे मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढू शकतो.
प्रोसेस्ड फूड्स
प्री-डायबिटीजच्या रुग्णांनीही प्रोसेस्ड फूड्स खाऊ नयेत. कारण त्यामध्ये साखर, अनहेल्दी फॅट्स आणि मीठ जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. याशिवाय, प्री-डायबिटीजच्या बाबतीत, पांढरे बटाटे, रताळे, कॉर्न यांसारख्या भाज्या खाणं टाळावे, कारण त्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. मात्र, या भाज्या मर्यादित प्रमाणात घेतल्यास आरोग्यालाही फायदा होतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.