
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैलीमुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहे. विशेषत: महिला अनेकदा आरोग्याच्या अनेक समस्यांना बळी पडतात. कामाच्या दबावामुळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ती तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे स्त्रिया अनेकदा जास्त आजारी पडतात. PCOS आणि PCOD या अशा दोन समस्या आहेत. जे जगभरातील महिलांमध्ये आढळणारे सर्वात सामान्य आजार आहेत.
बहुतेक लोकांना या दोन समस्यांमधील फरक माहित नाही. ज्यामुळे ते त्यांना समान समजतात. परंतु दोन्ही समस्या एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. या दोघांमध्ये काय फरक आहे जाणून घ्या. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणजे पीसीओएस आणि पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा पीसीओडी अनेक प्रकारे सारखे असू शकतात, परंतु या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहेत.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)
ही एक हार्मोनल स्थिती आहे, जी गर्भवती महिलांना प्रभावित करते. पॉलीसिस्टिक ओवरीज, अनियमित मासिक पाळी आणि ॲन्ड्रोजनचे उच्च स्तर ही याची लक्षणे आहेत.रिप्रोडक्टिव्ह सिस्टम व्यतिरिक्त, PCOS मुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाच्या समस्या देखील होऊ शकतात. त्याच्या निदानासाठी तीन निकष असतात. अल्ट्रासोनोग्राफीवर पॉलीसिस्टिक ओवरीज, उच्च एंड्रोजन पातळी आणि अनियमित मासिक पातळी. यामुळे PCOS ओळखण्यात मदत मिळते.
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD)
जरी PCOD आणि PCOS हे शब्द सारखे वाटत असले तरी PCOD मुळे अनेक ओवरीज सिस्ट होऊ शकतात. यामध्ये PCOS शी संबंधित इतर कोणतीही लक्षणे नाहीत. अनियमित मासिक पाळी आणि ओवरीज सिस्ट ही PCOD ची सामान्य लक्षणे आहेत. परंतु PCOS शी संबंधित हार्मोनल अडथळे आणि चयापचय समस्या नेहमीच उपस्थित नसतात.
निरोगी वजन राखणे
जर एखादी व्यक्ती लठ्ठ असेल किंवा जास्त वजन असेल, तर PCOS आणि PCOD ची लक्षणे अधिक बिघडू शकतात. म्हणून संतुलित आहारासोबत नियमित व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहून ही समस्या कमी होऊ शकते.
निरोगी आहार
संतुलित आणि सकस आहाराच्या मदतीने या समस्या टाळता येतात. संपूर्ण धान्य, फळे, भाज्या, लीन मीट आणि निरोगी चरबीयुक्त आहाराचे पालन करणे फायदेशीर ठरेल. तसेच प्रक्रिया केलेले, साखर आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खा.
व्यायाम करा
शारीरिक हालचालींना तुमच्या रुटीनचा नियमित भाग बनवा. आठवड्यातून किमान 150 मिनिटे लाइट किंवा हेवी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
नियमित वैद्यकीय तपासणी
तुमच्या डॉक्टरांना नियमितपणे भेट दिल्याने तुम्हाला PCOS किंवा PCOD शी संबंधित कोणत्याही आरोग्य समस्या जसे की इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासही मदत होऊ शकते.
स्ट्रेस मॅनेजमेंट
जास्त तणावामुळे या समस्यांची लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये योग, ध्यान, आणि व्यायाम इत्यादींचा समावेश करू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.