
Post Office Scheme : जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना ज्यात तुम्ही गुंवणूक करू शकता. या योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. बाजारातील चढ-उताराचा याच्यावर परिणाम होत नाही. याचे व्याजदर सरकार ठेवते. ज्यांचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळत आहे.
तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडू शकता. हे खाते फक्त ५०० रुपयांमध्ये उघडता येते. यामध्ये वर्षाला १.५० लाख रुपयांपर्यंत जमा करता येईल. या खात्याची मॅच्युरिटी १५ वर्षांनी होते. परंतु मॅच्युरिटीनंतर ते ५-५ वर्षांच्या वर्षांनी आणखी वाढू शकते. (Latest Marathi News)
तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला १२,५०० रुपये जमा केल्यास आणि ते १५ वर्षे कायम ठेवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ४०.६८ लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक २२.५० लाख रुपये असेल, तर १८.१८ लाख रुपये तुमचे व्याज उत्पन्न असेल.
ही गणना पुढील १५ वर्षांसाठी वार्षिक ७.१ टक्के व्याजदर गृहीत धरून करण्यात आली आहे. व्याजदर बदलल्यास मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम बदलू शकते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज चक्रवाढ आहे.
जर तुम्हाला या योजनेतून कोट्याधीश व्हायचे असेल, तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ५-५ वर्षांसाठी दोनदा मुदतवाढ करावी लागेल. म्हणजेच आता तुमचा गुंतवणुकीचा कालावधी २५ वर्षांचा असेल. अशा प्रकारे २५ वर्षांनंतर तुमचे एकूण पैसे १.०३ कोटी रुपये होतील.
या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ३७.५० लाख रुपये असेल तर तुम्हाला व्याज उत्पन्न म्हणून ६५.५८ लाख रुपये मिळतील. लक्षात ठेवा की जर तुम्हाला पीपीएफ खात्याचा कालावधी वाढवायचा असेल तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी अर्ज करावा लागेल. मॅच्युरिटीनंतर खात्याचा कालावधी वाढवता येत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.