LIC ची 'ही' पॉलिसी आहे सर्वात लोकप्रिय, मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त परतावा

LIC ची 'ही' पॉलिसी आहे सर्वात लोकप्रिय, मॅच्युरिटीवर मिळणार जबरदस्त परतावा
LIC Jeevan Azad Plan
LIC Jeevan Azad PlanSaam TV
Published On

LIC Jeevan Azad Plan : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळकडे (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी पॉलिसी आहेत. देशातील कोट्यवधी लोकांनी एलआयसीच्या सर्व पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे.

या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये एलआयसीची एक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे, तिचे नाव आहे जीवन आझाद पॉलिसी (LIC Jeevan Azad Plan). जीवन आझाद पॉलिसी लॉन्च झाल्याच्या अवघ्या १५ दिवसांत ५० हजार पॉलिसी विकल्या गेल्या आहेत.

LIC Jeevan Azad Plan
LIC Jeevan Labh Scheme : LIC ची नवी योजना, 253 रूपये भरा 54 लाख कमवा, कसे ? जाणून घ्या सविस्तर

जीवन आझाद पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्याची मुदत ८ वर्षे आहे. समजा एखादा गुंतवणूकदार १८ वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी निवडतो, तर त्या व्यक्तीला फक्त १० वर्षांसाठी (१८-८) प्रीमियम भरावा लागतो. या पॉलिसीमध्ये किमान रक्कम २ लाख रुपये आणि कमाल रक्कम ५ लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता. (Latest Marathi News)

पॉलिसी खरेदी कारचं वय

कोणतीही व्यक्ती १५ ते २० वर्षांसाठी जीवन आझाद पॉलिसी घेऊ शकते. ९० दिवस ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. जीवन आझाद पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो.

१८, १९ आणि २० वर्षांपर्यंतचे प्लॅन तीन महिन्यांसाठी म्हणजे ९० दिवसांसाठी घेतले जाऊ शकतात. याशिवाय २ ते ५० वर्षे वयोगटातील लोक १६ वर्षांची योजना खरेदी करू शकतात. तीन वर्षे ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी १५ वर्षांसाठी खरेदी करू शकते.

LIC Jeevan Azad Plan
Sangli Rain News: सांगलीत जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने शेडचे पत्रे उडाले; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

समजा ३० वर्षांची व्यक्ती १८ वर्षांसाठी जीवन आझाद  योजना (Scheme) घेते. तो फक्त १० वर्षांसाठी २ लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी १२,०३८ रुपये जमा करेल.

नॉमिनी सुविधा

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास 'मूलभूत विमा रक्कम' किंवा पॉलिसी घेताना निवडलेल्या वार्षिक प्रीमियमच्या ७ पट नॉमिनीला दिले जातील. यासाठी अट अशी आहे की, मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेले एकूण प्रीमियम १०५ टक्क्यांपेक्षा कमी नसावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com