Sangli rain news
Sangli rain newsSaam Tv

Sangli Rain News: सांगलीत जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने शेडचे पत्रे उडाले; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सांगलीत जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याने शेडचे पत्रे उडाले

Sangli Latest News : सांगलीच्या कडेगाव तालुक्यात विजांच्या कडकडासह मुसळधार स्वरुपाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कडेगांव येथे शेड उडाल्याने 13 मजूर जखमी झाले असून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले आहे.  (Latest Marathi News)

Sangli rain news
Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशात ट्रकचा भीषण अपघात, लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू

तालुक्यात शेतकरी उन्हाळी पावसाच्या प्रतीक्षेत होते. तर कालपासून कडक ऊन पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आज दिवसभरही कडक ऊन पडले होते. तर सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि अन पावसाला सुरुवात झाली. (SANGLI NEWS)

कडेगांव मुसळधार पावसाने तासभर हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी आणि नागरिकांची एकच धावपळ झाली.

Sangli rain news
Sharad Pawar : सत्तेचा गैरवापर कसा होतो हे भाजपने दाखवून दिलं...; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र

आले काढण्यासाठी आलेले सुमारे ४५ मजूर कडेगाव येथील भाड्याच्या शेडमध्ये राहत होते. अवकाळी पाऊस व सोबत वादळ आल्याने हे शेड उडून गेले. यामध्ये १३ मजूर जखमी झाले असून यातील संसार उपयोगी साहित्य व शेडचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com