Ayodhya Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाताय? या गोष्टींना नो एन्ट्री! जाणून घ्या नियम

Travel Tourism : २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Saam tv
Published On

Important Entry Advisory For Ram Mandir :

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.

या दिवशी देशभरातील अनेक लोकांचा समावेश असणार आहे. अशातच अयोध्येतील (Ayodhya) राम (ram) मंदिराच्या प्रवेशाबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही देखील श्रीरामाच्या दर्शनाला जात असाल तर या गोष्टींकडे नो एन्ट्री देण्यात आली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. खाद्यपदार्थ

मंदिराच्या (Mandir) आवारात तुम्हाला खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार नाही. तसेच घरचे किंवा पॅक बंद असलेल्या पदार्थांना देखील बंदी आहे.

2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे

मंदिरात अभिषेक करण्याच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्यात आली आहे. मोबाईलपासून इलेक्ट्रॉनिक घड्याळ, इअरफोन, लॅपटॉप किंवा कॅमेरा या सर्व गोष्टींवर बंदी आहे.

Ayodhya Ram Mandir
Ways To Reach Ayodhya : रामलल्लाचे दर्शन घ्यायला अयोध्येला जाताय? कमी वेळात पोहचण्यासाठी हे आहेत सोपे मार्ग

3. बेल्ट आणि शूजवरही आहेत नियम

प्राणप्रतिष्ठेदरम्यान बेल्ट, चपला आदी गोष्टींना देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या आत पर्स देखील घेऊन जाता येणार नाही.

4. पूजेची थाळी

स्थापनेच्या वेळी तुम्हाला पूजेची थाळी देखील घेऊन जाता येणार नाही. या काळात पूजा करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

5. कपड्यांसाठी देखील नियम

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पारंपारिक कपडे परिधान करणाऱ्यांच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसरात अद्याप कोणताही ड्रेस कोड दिला नसला तरी, पारंपारिक पोशाख परिधान करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Prasad : घरबसल्या फ्रीमध्ये भक्तांना मिळणार अयोध्येतून श्रीराम मंदिरातील प्रसाद, ऑनलाइन बुकिंग कशी कराल?

6. या लोकांना प्रवेश

२२ जानेवारीला या कार्यक्रमात ज्या लोकांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com