Valentine Week 2023 : व्हॅलेंटाईन विकमध्ये पार्टनरसोबत फिरायला जायचा प्लान करताय ? 'या' रोमॅंटिक पर्यटन स्थळांना भेट द्या!

फेब्रुवारी हा महिना जोडप्यांसाठी अत्यंत आनंदी महिना असतो.
Valentine Week 2023
Valentine Week 2023 Saam Tv
Published On

Valentine Week 2023 : फेब्रुवारी हा महिना जोडप्यांसाठी अत्यंत आनंदी महिना असतो. फेब्रुवारीच्या महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतो. त्यामुळे बरेच कपल्स आपापल्या पार्टनरला घेऊन बाहेर फिरायला जातात. एकमेकांच्या आयुष्यामधील जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवतात.

त्याचबरोबर कपल्स वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला देखील जातात. आज आम्ही तुम्हाला असे काही रोमँटिक डेस्टिनेशन सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन तिथे फिरायला जाऊ शकता.

Valentine Week 2023
Valentine’s Week : प्रेमीयुगलांसाठी, 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त 'या' देशातलं सरकार वाटणार 95 दशलक्ष फ्री कंडोम !

लव बर्ड्सचा फेवरेट फेस्टिवल म्हणजेच व्हॅलेंटाईन हा दिवस फेब्रुवारी महिन्याच्या 14 तारखेला येतो. व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी कपल्स वेगवेगळ्या प्रकारची प्लॅनिंग करतात.

फेब्रुवारीच्या या दिवसांमध्ये जास्त करून लोक आपल्या पार्टनरला सोबत घेऊन फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या पार्टनरला घेऊन एखाद्या रोमांटिक डेस्टिनेशन वरती जायचं असेल आणि तुमच्या पार्टनरला (Partner) आनंदी पहायचा असेल. तर तुम्ही या ठिकाणी जाणे अत्यंत गरजेचे आहे.

1. गोवा -

निसर्ग सौंदर्यसाठी प्रसिद्ध असलेले गोवा (Goa) हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोव्यामध्ये देण्यासाठी परदेशी पर्यटक सुद्धा येतात. त्याचबरोबर गोवा हे पर्यटनस्थळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य स्थळ आहे. त्याचबरोबर कपल्ससाठी गोवा हे अत्यंत सुंदर डेस्टिनेशन आहे.

Valentine Week 2023
Valentine's Day: काय सांगता! १० कोटी लोकांना कंडोम वाटप; 'या' देशाने घेतला निर्णय

2. आग्रा -

'ताज नगरी' या नावाने ओळखला जाणारा आग्रा हे पर्यटन स्थळ देखील हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन आहे. आग्र्याला जाण्यासाठी फेब्रुवारीचा महिना बेस्ट आहे. कारण की या दिवसांत वातावरण थंड असल्यामुळे सगळेजण रोमँटिक मूडमध्ये असतात.

त्याचबरोबर आग्रा येथे फिरण्यासाठी अनेक डेस्टिनेशन आहेत. आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेशात असलेल्या राज्य मधील एक मोठे शहर आहे. आग्रा मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे ताजमहाल हे आहे.

निसर्गाच्या तोडीस तोड सुंदर असलेले हे ताजमहल पाहण्यासाठी लोक देशविदेशांमधून येतात. मुघल सम्राट शान जहान याने आपल्या पत्नीसाठी म्हणजेच मुमताजसाठी हे ताजमहाल बांधलं होतं. तिच्या मृत्यूनंतर तिची आठवण म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com