Valentine’s Week : प्रेमीयुगलांसाठी, 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त 'या' देशातलं सरकार वाटणार 95 दशलक्ष फ्री कंडोम !

जगभरातील सरकारही सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत पावले उचलत आहेत.
Valentine’s Week
Valentine’s Week Saam Tv
Published On

Valentine’s Week : जगभरातील सरकारही सुरक्षित लैंगिक संबंधाबाबत पावले उचलत आहेत. त्याच वेळी, व्हॅलेंटाइन डेच्या आधी, या देशाची सरकार आपल्या देशातील लोकांना 95 दशलक्ष मोफत कंडोम वितरित करण्याची योजना आखत आहे.

थायलंड व्हॅलेंटाइन डेपूर्वी सुरक्षित लैंगिक संबंधाला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. थाई सरकारच्या प्रवक्त्या रचाडा धनादिरेक यांनी मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, 1 फेब्रुवारीपासून युनिव्हर्सल हेल्थकेअर कार्डधारकांना एका वर्षासाठी आठवड्यातून 10 कंडोम मिळू शकतात.

Valentine’s Week
Condom Cafe : चर्चा फक्त कंडोम कॅफेची! जिकडे तिकडे कंडोम, बाहेर पडताना गिफ्टमध्येही कंडोम; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

थायलंड सरकार कंडोमचे वितरण करणार आहे -

हे देशभरातील रुग्णालयांच्या फार्मसी आणि प्राथमिक काळजी युनिटमधून मिळू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, थायलंड सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, देशातील गोल्ड-कार्डधारकांना मोफत कंडोम उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेमुळे आजारांपासून (Disease) बचाव आणि सार्वजनिक आरोग्याला (Health) चालना मिळेल. यासोबतच सिफिलीस, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गोनोरिया, क्लॅमिडीया आणि एड्स यासह काही आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Valentine’s Week
Male Condom Mistakes : निरोध वापरताना 'या' चुका करताय? होऊ शकतो भयंकर आजार

थायलंडमध्ये लैंगिक संक्रमित रोगांची संख्या वाढली आहे -

थायलंडमध्ये अलिकडच्या वर्षांत लैंगिक संक्रमित आजारांमध्ये वाढ झाली आहे. 2021 मध्ये, देशात सिफिलीस आणि गोनोरियाच्या निम्म्याहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजारांची लागण झालेल्या लोकांची सर्वाधिक संख्या 15 ते 19 आणि 20 ते 24 वर्षे वयोगटातील असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. 2021 मध्ये, अधिकृत आकडेवारीनुसार, 15 ते 19 वयोगटातील प्रत्येक 1,000 थाई मुलींपैकी 24.4 मुलींनी जन्म दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com