कोणता फोन आहे सगळ्यात बेस्ट? Google Pixel 8 की, iPhone 15 ; जाणून घ्या स्टोअरेज आणि बॅटरीबद्दल सर्वकाही

Google Pixel 8 VS iPhone 15 Camera Comparison: अ‍ॅपलनंतर आता गुगलने आपली फ्लॅगशिप सीरीज गुगल पिक्सेल 8 लॉन्च केली आहे.
Google Pixel 8 VS iPhone 15 Comparison
Google Pixel 8 VS iPhone 15 ComparisonSaam Tv
Published On: 

Best Smartphone:

अ‍ॅपलनंतर आता गुगलने आपली फ्लॅगशिप सीरीज गुगल पिक्सेल 8 लॉन्च केली आहे. Apple आणि Google या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. अ‍ॅपलने 12 सप्टेंबरला iPhone 15 लाँच केला होते. फोनमध्ये अनेक नवीन फिचर्स आहेत.

अ‍ॅपलच्या आयफोन 15 नंतर आता गुगलने (Google) 4 सप्टेंबरला Google Pixel 8 सीरीज लाँच केली आहे. गुगलने The Event Made By Google या इव्हेंटमध्ये ही सीरीज लाँच केली आहे. या फोनने आयफोनला तगडी टक्कर दिली आहे.

आयफोन आणि गुगलच्या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फिचर्स आहेत. या दोन्ही फोनमध्ये कोणता स्मार्टफोन सर्वौत्तम आहे. याबाबत अनेकांच्या मनात संकोच करत आहेत. जर तुम्हीही हे फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज या दोन फोनमधील फरक पाहूयात.

डिझाइन

गुगल आणि अ‍ॅपलच्या नवीन फोनच्या (Phone) लूक आणि डिझाइनमध्ये फारसा बदल केला नाही. दोन्ही फोन ग्लास बॅक पॅनलसह येतात. Apple मध्ये तुम्हाला टायटॅनियम फ्रेम तर Google Pixel 8 मध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे.

Google Pixel 8 VS iPhone 15 Comparison
Google Pixel 8 Series Launch : स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच प्री-ऑर्डर सुरू, कधी होणार ग्रँड लॉंचिंग? पाहा काय आहे प्लान

डिस्प्ले

Apple ने युजर्ससाठी iPhone15 Pro मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले दिला आहे. तर Google Pixel 8 मध्ये 6.7 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे. दोन्ही स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहेत. आयफोनमध्ये Ceramic Shield Glass तर Google Pixel 8 मध्ये Gorilla Glass Victus 2 देण्यात आले आहे.

iPhone15 Pro मध्ये iOS 17 हे फीचर (Feature) आहे तर Google Pixel 8 मध्ये Android 14 फीचर देण्यात आले आहे. अ‍ॅपलच्या फोनमध्ये फास्ट प्रोसेसिंगसाठी A17 बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे तर Google Pixel 8 मध्ये Google Tensor G3 चिपसेट देण्यात आले आहे.

रॅम आणि स्टोरेज

आयफोनमध्ये ग्राहकांना 8GB रॅमसह 128GB, 256 GB,512 GB, 1TB स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. तर Google Pixel 8 हा 12GB रॅमसह 128GB, 256 GB,512 GB, 1TB मध्ये उपलब्ध आहेत.

Google Pixel 8 VS iPhone 15 Comparison
Smartphone Heating Problem : लाखोंच्या iPhone 15 सिरीजमध्ये आढळून येतेय ही समस्या, वाचा सविस्तर

कॅमेरा

आयफोनमध्ये ट्रीपल कॅमेरा (Camera) सेटअप दिला आहे. यात प्राथमिक कॅमेरा 48MP आहे. हा कॅमेरा OIS फीचर्ससोबत उपलब्ध आहे. तर सेकंडरी कॅमेरा 12MP आहे. तर तिसरा कॅमेरा 12MP आहे. आयफोनचा सेल्फी कॅमेरा 12MP आहे.

Google Pixel 8 मध्ये ट्रिपल कॅमेरा स्लॉट देण्यात आला आहे. प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. हा कॅमेरा OIS फीचर्ससोबत उपलब्ध आहे.सेकंडरी आणि तिसरा कॅमेरा 48MP चा आहे. सेल्फीसाठी Google Pixel 8 Pro मध्ये 10.5 MP कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

आयफोनमध्ये 3274mAhm बॅटरी मिळते. यात 15 वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Google Pixel 8 मध्ये बॅटरी आयफोनपेक्षा मोठा असून 5050mAh ची आहे. गुगलने यात 30W सह फास्ट चार्जिंगला सपोर्ट केला आहे. यासोबत 23W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे.

Google Pixel 8 VS iPhone 15 Comparison
Apple iPhone 15: Type C चार्जरचे जबरदस्त फायदे; वाचतील तुमच्या खिशातील पैसे

किंमत

गुगलने Google Pixel 8 भारतात 128 GB रॅम आणि 128 स्टोरेज ₹75,999 रुपयांना लाँच केला आहे. Apple iPhone 15 ची 8GB रॅम आणि 128 स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 79,900 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com