Pitru Paksha 2023 : पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि पिंडदान करण्याचा दिवस

Pitru Paksha 2023 Date : भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसांचे श्राद्ध सुरु होते.
Pitru Paksha 2023
Pitru Paksha 2023 Saam Tv
Published On

Pitru Paksha 2023 Tithi :

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्षाचा पंधरवडा सुरु होते. भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसांचे श्राद्ध सुरु होते. या महिन्यात पितरांचे श्राध्द आणि त्यांचे धार्मिक कार्य केले जाते. यंदा २९ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरु होणार आहे.

पितृपक्षात पितरांचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. तसेच या पंधरा दिवसात आपले पूर्वत पृथ्वी तलावर येतात असा समज आहे. पितृपक्षात पितरांना खुश करायचे असते. या महिन्यात ते आपल्याला आर्शिवाद देतात आणि अनेक वाईट गोष्टींपासून संरक्षण होते अशी मान्यता आहे.

Pitru Paksha 2023
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

पितृपक्ष (Pitru Paksha) हा पंधरवडा पितरांचा आदर करण्याची वेळ असते. श्राध्द पक्षात तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांनाच समाधान मिळत नाही तर पितरांचे ऋणही फेडले जाते.

1. पितृपक्षाची तिथी कधी पासून?

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला २९ सप्टेंबरला दुपारी ३.२६ ला सुरु होईल तर ३० सप्टेंबरला दुपारी १२.२१ पर्यंत असेल. यंदा सर्व पितृ अमावस्या ही १४ ऑक्टोबरला आहे.

2. श्राद्ध विधी करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

शास्त्रात सकाळ आणि संध्याकाळी देवी-देवतांची पूजा (Puja) केली जाते. दुपारची वेळ ही पितरांना समर्पित आहे. यावेळी पंचबली अर्पण करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com