Petrol Diesel Prices (14th Oct): वीकेंडला फिरायला जाताय? गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate Today (14th October 2023): देशातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहे.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam TV
Published On

Petrol Diesel Price in Maharashtra:

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावावर राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव ठरतात. दरम्यान देशातील पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहे. देशातील काही शहरात पेट्रोल डिझेलच्या भावात घट तर काही ठिकाणी दरवाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीती 5.69 टक्क्यांनी वाढ झाली असून ऑईल प्रति बॅरल 90.89 डॉलरने विकले जात आहे. WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत 5.77 टक्के वाढ झाली आहे. ऑइल प्रति बॅरल 87.69 डॉलरवर विकले जात आहेत.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर विकले जात आहे.

चैन्नईत पेट्रोल ३२ पैशांनी महागले असून पेट्रोल 103.07 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.66 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

Petrol Diesel Prices
Chanakya Niti On Health : निरोगी जीवन जगण्यासाठी नीतिशास्त्रातील हे सल्ले ठरतील उपयोगी, जाणून घ्या

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.73 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.38 आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 106.42 रुपये आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 107.45 रुपये आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Next Generation BMW X2 चा टिझर लॉन्च! Audi आणि Jaguar ला देणार टक्कर

पेट्रोल डिझेलचे भाव असे चेक करा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

Petrol Diesel Prices
Shardiya Navratri 2023 Festival : उत्सव नवरंगाचा, मान पैठणी जिंकण्याचा; नियम आणि अटी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com