अंडी खाताय, सावधान! तुमची किडनी होऊ शकते खराब, नवीन संशोधनात धक्कादायक माहिती

अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, कारण...
Eggs harmful for health
Eggs harmful for healthsaam tv
Published On

मावळ : मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी बागेत पिकवलेल्या भाज्या, दूध, अंडी या प्रथिनयुक्त पदार्थांचा (Protein) आपल्या डायटमध्ये समावेश करावा लागतो. पिळदार शरीरयष्टी करण्यासाठी बॉडी बिल्डर्स त्यांच्या आहारात नेहमीच अंड्याचं प्रमाण अधिक ठेवतात. परंतु,अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: घरी पाळलेल्या कोंबडींची अंडी खाणे (Eggs in diet) आरोग्यास हानीकारक ठरू शकते. पोल्ट्रीफार्मपेक्षा घरातील कोंबड्यांची अंडी धोकादायक असल्याचं, एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे.

Eggs harmful for health
औरंगाबाद महापालिकेत चक्क कुत्रे घोटाळा? RTI मध्ये धक्कादायक माहिती उघड

सायन्स डायरेक्टच्या अहवालानुसार,अंडी फक्त ताजे असणे हे त्याच्या शुद्धतेचे लक्षण नाही.यात आणखी एक धोका आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) कोंबड्यांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील २५ हजार घरांच्या बागांमधून मातीचे नमुने घेण्यात आले. यामध्ये सिडनीतील ५५घरांच्या मातीचा समावेश होता. पोल्ट्रीमध्ये वाढवलेल्या कोंबड्यांपेक्षा पाळीव कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये ४० टक्के जास्त शिसे आढळून आल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. सिडनीमध्ये दर दोनपैकी एका कोंबडीमध्ये शिसे आढळून आले.

शिसे आरोग्यासाठी धोकादायक

कोंबडी आणि त्यांच्या घरांमध्ये वाढलेल्या अंड्यांमध्येही शिसे आढळून आले आहे. जे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. संशोधनाचे निकाल महत्त्वाचे आहेत, कारण एकट्या ऑस्ट्रेलियात चार दशलक्ष लोक पोल्ट्री पाळतात आणि त्यांची अंडी मोठ्या प्रमाणावर विकली जातात. घरात वाढलेली कोंबडीची अंडीही आरोग्यासाठी चांगली नसतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Eggs harmful for health
संजय राऊतांपाठोपाठ त्यांच्या मित्रावरही गुन्हा दाखल, किरीट सोमय्यांनी पोलिसांत केली तक्रार

मूत्रपिंडाचे नुकसान आणि गर्भपात होण्याचा धोका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते,शिसे अनेक प्रकारे मानवांसाठी धोकादायक आहे. यामुळे रक्तदाब वाढतो, किडनी खराब होऊ शकते,हृदयविकार होऊ शकतो आणि IQ पातळी देखील कमी होऊ शकते.याशिवाय, हे महिलांमध्ये गर्भपाताचे कारण बनू शकते.

कोंबड्यांमध्ये शिसे कसे पोहोचले ?

संशोधकांचे म्हणणे आहे की, कोंबडीमध्ये धोकादायक शिसे मातीतून पोहोचले.कोंबडी सहसा मातीत पडलेल्या गोष्टी खातात आणि माती पोखरतात. अशा प्रकारे त्यांच्या शरीरात शिशाचा प्रवेश होतो.शरीरात आल्यानंतर त्याचे प्रमाण अंड्यांमध्येही आढळून आले.संशोधनादरम्यान असे आढळून आले की कोंबडीच्या अन्न आणि पाण्यात शिशाचे प्रमाणही असते. ऑस्ट्रेलियात घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीत याची पुष्टी झाली आहे.मात्र, पुणे जिल्हा असेल किंवा राज्य असा प्रकार झालेला नाही. थोडेही लक्षण जर दिसले तर आम्ही त्यावर लक्ष देऊन पोल्ट्री फार्म मालकांना सूचना देऊ, अशी माहिती मावळचे पशू धन पर्यवेक्षक दीपक शिर्के यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com