Peruchi Bhaji
Peruchi BhajiGoogle

Peruchi Bhaji: जेवणाची चव वाढवेल आबंट-गोड पेरुची भाजी; ही रेसिपी नक्की ट्राय करा

Recipe: हिवाळ्याचा महिन्यात बाजारात पेरु जास्त प्रमाणात दिसतात. पेरु हे फळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तुम्ही पेरु खाण्यासोबतच त्याची भाजीदेखील बनवू शकता.
Published on

Peruchi Bhaji Recipe:

हिवाळ्याचा महिन्यात बाजारात पेरु जास्त प्रमाणात दिसतात. पेरु हे फळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. पेरु चवीला गोड असतो. त्यावर छान लाल तिखट, मीठ टाकून खायची मज्जा काही वेगळीच असते. मात्र, पेरु अनेक प्रकारे आपण खाऊ शकतो. एक म्हणजे पेरुची भाजी बनवून तुम्ही ती खाऊ शकता. (Latest News)

पेरु खालल्याने सर्दी खोकला होतो. म्हणून अनेकदा लहान मुलांना पेरु देणे आपण टाळतो. अशावेळी तुम्ही पेरुची भाजी बनवून लहान मुलांना देऊ शकतात. पेरुमध्ये खूप गुणधर्म असतात. ज्यामुळे आरोग्यास फायदा होतो. आज आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर अशी पेरुच्या भाजीची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • पेरुच्या बारीक फोडी

  • तेल

  • मोहरी

  • मेथीचे दाणे

  • मिरची

  • हिंग

  • लाल तिखट

  • मीठ चवीनुसार

  • लिंबू

  • काळा मसाला

  • कोथिंबीर

Peruchi Bhaji
Makar Sankranti 2024 Recipe: तीळ आणि गुळापासून बनवा चविष्ट गोडाचा पदार्थ, लाडू-चिक्कीसाठी बेस्ट पर्याय; पाहा रेसिपी

कृती

  • सुरुवातील पेरु स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या बारीक फोडी कापून घ्या. पेरु हे जास्त पिकलेले किंवा खराब झालेले नसावे.

  • एक कढईत तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी, मेथीचे दाणे, हिरवी मिरची आणि हिंग टाकून फोडणी द्या.

  • या फोडणीत हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका.

  • या फोडणीत कापलेल्या पेरुच्या फोडी टाका. मंद आचेवर थोडा वेळ ही भाजी शिजवून घ्या.

  • त्यात थोडे पाणी टाकून थोडा वेळ भाजीवर झाकण ठेवून शिजवून घ्या.

  • शेवटी त्यावर लिंबू पिळून घ्या. त्यात वरुन काळा मसाला टाका. त्यावर कोथिंबीर घाला.

तुम्ही ही भाजी चपाती, भाजी किंवा रोटीसोबत खाऊ शकतात. याचसोबत तुम्ही फक्त भाजीदेखील खाऊ शकतात.

Edited By- Siddhi Hande

Peruchi Bhaji
Vastu Tips : लिव्हिंग रुम बनवताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा येईल मोठं आर्थिक संकट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com