Ganesha Idol Direction : गणरायाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवायची? चूक झाल्यास घरात येतात अडचणी

Ganesha Idol Perfect Direction : गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार असला तर स्थापनेसाठी योग्य दिशा कोणती याची माहिती जाणून घ्या.
Ganesha Idol Perfect Direction
Ganesha Idol DirectionSaam TV
Published On

हिंदू धर्मात श्री गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे. गणराया म्हणजे विद्येची आणि सुख, समृद्धीची देवता मानली जाते. दरवर्षी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतात. काही व्यक्तींच्या घरी कायमस्वरुपी गणपती बाप्पाची मूर्ती असते. गणेश मूर्ती स्थापनेसाठी हिंदू धर्मात काही नियम आणि अटी दिल्या आहेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

बाप्पाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी

गणरायाची मूर्ती ज्या घरात असते तिथे कायम सुख आणि शांती नांदते असं म्हणतात. बाप्पा घरावर आलेली सर्व विघ्न दूर करतात. त्यामुळे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्व किंवा पश्चिम दिशेला केली पाहिजे. विशेष म्हणजे पिंपळ, आंबा आणि लिंबू या झाडांखाली बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आणखी जास्त शुभ मानले जाते.

Ganesha Idol Perfect Direction
Ganesh Chaturthi 2024 : मोदकाच्या कळ्या पाडणं जमत नाही, ही एक सोपी टीप करेल मदत

देव्हाऱ्यातील मूर्ती

काही व्यक्तींची गणपती बाप्पावर जास्त श्रद्धा असते. त्यामुळे घरामध्ये बाप्पाचा फोटो, छोटी आणि मोठी मूर्ती ठेवली जाते. मात्र घरात फक्त मंदिरात बाप्पाची मूर्ती कायमस्वरुपी ठेवली पाहिजे. तसेच एक पेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो एका घरात असू नयेत. आपण घरामध्ये झोपताना कोणत्या दिशेला पाय असतात ते पाहा. बाप्पाची मूर्ती असलेल्या दिशेला पाय करून झोपू नका, असे करणे अशुभ मानले जाते.

मूर्तीचे प्रकार

गायीच्या शेणापासून बनलेली मूर्ती

बाप्पाची छोटीशी गाईच्या शेणापासून बनलेली मूर्ती गावी अनेक व्यक्ती आपल्या घरी ठेवतात. ही मूर्ती घरात असल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या जंतूंचा शिरकाव होत नाही. घरातील सर्व सदस्य कायम निरोगी राहतात.

पंच धातूंची मूर्ती

तुम्ही घरामध्ये पंचधातूंची मूर्ती सुद्धा ठेवू शकता. अशी मूर्ती घरातील देवळात असल्याने वास्तुदोषांपासून मुक्ती होते. घरात चांगली आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

हळदीची मूर्ती

हळदीपासून बनवलेली बाप्पाची मूर्ती भाग्यवान असते. ही मूर्ती ज्या घरात असेल त्या घरातील व्यक्तींचे भाग्य उजळते आणि चमकते.

Ganesha Idol Perfect Direction
Ganpati Idol Viral Video: फक्त पिंपळाच्या पानांपासून गणेशाची 42 फूट उंच मूर्ती; दर्शनासाठी भक्तांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com