गणपती बाप्पा आपल्यावर आलेली सर्व विघ्न दूर करतो त्यामुळे त्याला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. राज्यात आणि संपूर्ण देशभरात आज ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नागरिक गणपतीची मनोभावे सेवा करत आहेत. अशात गणपती मूर्ती आणि डेकोरेशनचे देखील अनेक व्हिडीओ समोर आलेत. (Latest Ganpati Viral Video)
सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच पिंपळाच्या पानांपासून बनवलेली 42 फूट उंचीची एक मूर्ती देखील तुफान व्हायरल झाली आहे. संपूर्ण मूर्तीमध्ये फक्त पिंपळाच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
30 हजार दिव्यांचा वापर
गणपती बाप्पाची 42 फुटांची मूर्ती म्हणजे फार मोठी मूर्ती झाली. ही मूर्ती बनवण्यासाठी पिंपळाच्या पानांसह 30 हजार दिव्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मूर्ती इतकी सुंदर आणि आकर्षक बनली आहे की, कोणालाही या मूर्तीवरून आपली नजर हटवावी वाटत नाही.
आज 19 सप्टेंबर रोजी घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर म्हणजेच 10 दिवसांनी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.