Ganpati Song Foreign Version: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'चं फॉरेन व्हर्जन बघितलंत का? अभिनेत्याच्या लाडक्या मुलीचं गाणं ऐकाच!

Ganpati Song Viral Video: आधी मेल, फिमेल आणि आता फॉरीन वर्जन व्हायरल
Ganpati Song Foreign version
Ganpati Song Foreign versionSaam TV
Published On

Amchya Papani Ganpati Anala:

आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल झालं आहे. चिमुकल्या साईराजने हे गाणं गाऊन साऱ्यांनाच भूरळ पाडली. आता त्याचं हे गाणं फिमेल वर्जन आणि ते पण परदेशी मुलीच्या आवाजात गाणं गात असल्याचं समोर आलं आहे. हे गाणं चिमुकल्या अन्वी विचारेने गायलं आहे. (Latest Marathi News)

Ganpati Song Foreign version
Ganpati Sarees: यंदाच्या गणेशोत्सवासाठी भन्नाट साडी कलेक्शन; नक्की ट्राय करा

सोशल मीडियावर साईराजचं गाणं व्हायरल झाल्यावर सर्वांनीच त्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. अशात अन्वीने मराठी मुलगी आणि फॉरेनमधील मुलगी कसं गाणं गाणार ते गात आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं तिने आधी स्वता साध्या आवाजात गायलं आणि नंतर फॉरेन कंट्रीमधील मुलगी हे गाणं कसं गाणार ते गाऊन दाखवलं.

अन्वीचे बोबडे बोल आणि मजामस्ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अन्वीने यावेळी शाळेचा गणवेश घातलेला आहे. तिच्या या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिनेता अंशुमन विचारेने अन्वीचा हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. यावर अंशुमनची मुलगी अगदी त्याच्याप्रमाणेच आहे असं काहींनी म्हटलंय.

अंशुमनने अन्वीचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे कुणीही शिकवलेलं नाही. आजकालची सगळी पिढी एक पाऊल पुढे आहे. ही सगळी बच्चेकंपनी खूप पुढे जाणार. गणपती बाप्पा मोरया, असं त्याने यात म्हटलं आहे.

मराठी भाषेत पार्वतीचा उच्चार किती ऍक्युरेट करते ही गोडुली, कित्ती गोड. याला म्हणतात टॅलेंट, नाहीतर आपलं तेच तेच, काय भारी ग अन्वी, अशा कमेंट्स अन्वीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी केल्या आहेत.

अंशुमन आपल्या मुलीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. याआधी देखील अन्वीच्या मस्तीचे, जेवणाचे अनेक व्हिडीओ त्याने पोस्ट केलेत. अन्वीसाठी अंशुमनने एक युट्यूब चॅनल देखील सुरू केलंय. यावर अन्वीचे बरेच व्हिडीओ आहेत.

Ganpati Song Foreign version
Ganpati Viral Video : बाप्पासाठी कायपण! 2 कोटी नोटा अन् 50 लाख नाण्यांनी सजलं गणपती मंदिर व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com