
३१ मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेकडून तंबाखू विरोधी दिन म्हणून मानला केला जातो. या दिवासानिमित्त तंबाखूच्या सेवनाविरोधी जनजागृती केली जाते. या निमित्ताने आपण या सेकंड हॅंड स्मोकिंग(पॅसिव्ह स्मोकींग) म्हणजे काय त्याचप्रमाणे याचे काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला सांगणार आहोत. धूम्रपान न करताही अनेक व्यक्ती कर्करोगाचा बळी ठरत आहेत.
सध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.पॅसिव्ह स्मोकिंग याला सेकंड हॅन्ड स्मोकिंग देखील म्हणतात. यामध्ये, व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाही. मात्र दुरा व्यक्ती जेव्हा धूम्रपान करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे धोका निर्माण होतो. या धुरामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो.
सेकंड आणि थर्ड हँड स्मोकमधील कार्सिनोजेन्समुळे धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुस, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरसह विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. या विषारी पदार्थांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे फुफ्फुसाच्या पेशी तसंच शरीराच्या इतर भागांमधील डीएनएचं नुकसान होतं. परिणामी त्यांचं रूपांतर कॅन्सरच्या पेशींमध्ये होतं.
टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल सांगतात की, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. याशिवाय ताप असणं, अशक्तपणा, वजन कमी होणं ही लक्षणंही दिसून येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.