Parenting Tips : परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करावा, बुद्धी होईल अधिक तल्लख !

एक्झाममध्ये मुलाचे डोके चांगले चालावे म्हणून चांगल्या डाएटची काळजी देखील घ्यावी लागते.
Parenting Tips
Parenting Tips Saam Tv

Parenting Tips : 10वी आणि 12वी च्या बोर्ड एक्झाम येत्या काही दिवसांतच सुरू होतील. अशातच मुलांना जेवढी पेपर्सची चिंता असते. त्याच्या दोन पटीने जास्त चिंता पालकांना असते.

आपल्या मुलांची एक्झाम चांगली जावी म्हणून पालक सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतात. अशातच एक्झाममध्ये मुलाचे डोके चांगले चालावे म्हणून चांगल्या डाएटची काळजी देखील घ्यावी लागते.

Parenting Tips
Parenting Tips : रात्रभर तुमचे बाळ झोपू देत नाही ? सतत रडरड करते ? 'या' टिप्स फॉलो करा

आज आम्ही तुम्हाला काही चांगल्या डाएटब्ध्दल सांगणारं आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाला बोर्डाच्या पेपरसाठी चांगल्या प्रकारे तयार कराल.

1. हेल्दी नाश्तापासून करा सुरवात :

तुमच्या मुलांच्या दिवसाची सुरूवात हेल्दी नाश्त्यापासून करा. पुरी, पराठा, किंवा तळलेले पदार्थ देण्यापेक्षा दुध, अंडी, ओट्स, मुसली, ज्युस, फळे (Fruit), उपमा यांसारख्या पदार्थाचे सेवन करण्यास सांगा. असं केल्याने गलाइसेमीकची मात्रा कमी होईल आणि शरीराला योग्य प्रमाणात ग्लुकोज मिळत राहील. सोबतच बदाम, अक्रोड, काजू, मनुके, संत्रे, अंजीर, सोयाबीन आणि सफरचंद याचे देखील सेवन करण्यास सांगा. हे खाल्ल्याने तुमच्या मुलांची स्मरणशक्ती मजबूत राहील.

2. ब्रेकफास्ट आणि लंचच्यामध्ये या गोष्टी खायला द्या :

अनेक मुलांना सारखी भूक लागत असते. त्यामुळे त्यांना चीज, बर्गर, पिझ्झा, पास्ता, नूडल्स, केक यांसारखे अनहेल्दी फूड देण्यापेक्षा ड्राय फ्रुट्स, स्मुदी, फ्रूट जुस, सुप, डार्क चॉकलेट (Chocolate) यांसारख्या गोष्टी देखील खायला देत जा. या गोष्टी खाल्ल्याने तुमचा मुलगा पूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहील आणि त्याचे अभ्यासात देखील मन लागेल.

Parenting Tips
Parenting Tips : अभ्यास करुनही तुमचे मुल 'ढ' का आहे ? तज्ज्ञांनी सांगितले कारण

3. लंचमध्ये हे खायला द्या, डोकं राहील ऍक्टिव्ह आणि वाढेल इम्युनिटी :

तुमच्या मुलाच्या (Child) डोक्याचा विकास होण्यासाठी त्याला दररोज गाजर, भोपळा, बीट, हिरव्या पालेभाज्या, मच्छी यांसारख्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगा याने त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल आणि बुद्धी देखील तल्लख होईल. त्याचबरोबर लंचमध्ये पुरी किंवा पराठे देण्यापेक्षा चपाती, डाळ भात, सॅलेड, दही किंवा रायता यासारख्या गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश करा. त्याचबरोबर त्यांना ब्रोकली आणि पालक या भाज्या देखिल खायला सांगा. यामध्ये ल्युटिन, फॉलेट, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन (Vitamins) सारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. ते तुमच्या बौद्धिक वाढीसाठी चांगले असतात.

Board Exam
Board Exam canva

4. संध्याकाळच्या वेळी या गोष्टींचे सेवन करा :

लंच नंतर संध्याकाळच्या वेळी मुलांना थोडीशी भूक लागलेली असते. तेव्हा त्यांना चहा ,कॉफी, पकोडे, किंवा काही तळलेले पदार्थ देण्यापेक्षा भोपळ्याच्या बिया, अक्रोड, फ्रुट ज्यूस, गोड लस्सी, नमकीन लस्सी, स्ट्रॉबेरी, किंवा ओट्स यांसारख्या गोष्टी देऊ शकता.

5. रात्रीच्या जेवणामध्ये या गोष्टी सामील करा :

लहान मुलांना रात्रीच्या जेवणामध्ये पोषक तत्व असलेले पदार्थ खायला द्या. त्याचबरोबर जेवण घरचेच असले पाहिजे. मुलांना राजमा चावल, डाळ, खिचडी, छोले, चपाती, भाजी यांसारखे हेल्दी पदार्थ खायला द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com