Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : रात्रभर तुमचे बाळ झोपू देत नाही ? सतत रडरड करते ? 'या' टिप्स फॉलो करा

अनेक पालकांची ही समस्या असते की बाळ रात्रभर झोपत नाही आणि सारखंमध्ये मध्ये उठून रडत आहे.

Parenting Tips : प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या बाळ सुदृढ आणि त्याच आरोग्य स्वस्थ असाव. बाळाच्या चांगल्या विकासासाठी आणि वाढीसाठी त्याची चांगली देखभाल करणे गरजेचे असते.

बाळाला हेल्दी आणि आनंदी ठेवण्यासाठी चांगल्या पोषणासह भरपूर प्रमाणात झोप घेणे सुद्धा गरजेचे असते. अनेक पालकांची ही समस्या असते की बाळ रात्रभर झोपत नाही आणि सारखंमध्ये मध्ये उठून रडत आहे.

Parenting Tips
Parenting Tips : नुकत्याच झालेल्या पालकांना चुकूनही सांगू नका 'या' गोष्टी

बऱ्याचदा असं होतं की, लहान बाळाच्या (Baby) स्किनवर एखाद्या प्रकारचे इन्फेक्शन किंवा रॅशेष आल्यामुळे बाळ चिडचिड करते. लहान बाळाला बोलता येत नसल्यामुळे ते रडते. अशा समस्येपासून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नारळाच्या तेलापासून (Oil) तुम्ही तुमच्या बाळाची झोप कशा पद्धतीने पूर्ण करू शकता.

1. स्लिप पॅटर्न करा इम्प्रूव :

बेबी डेस्टिनेशननुसार नारळाच्या तेलामध्ये कामिंग इफेक्ट असते. ज्याने बाळाला मालिश केल्यावर ती बाळ शांतपणे झोपते. त्याचबरोबर रिलॅक्स होते. यामुळे बाळ रात्रभर गाढ झोप घेऊ शकते. त्यामुळे दररोज तुमच्या बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करायला विसरू नका.

2. कोरड्या त्वचेपासून वाचवा :

थंडीच्या दिवसांमध्ये लहान बाळांची मुलायम स्किन ड्राय होऊ लागते. त्यामुळे बाळाला इरिटेट होते आणि इरिटेशनमुळे बाळ रडू लागते. त्यामुळे ड्राय स्किन वरती नारळाचे तेल हे एका मॉइश्चरायझरचे काम करते. नारळाच्या तेलामध्ये मॉइश्चरायझिंगचे गुण असतात. जेव्हा तुम्ही लहान बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करता तेव्हा त्यांच्या त्वचेला पोषण भेटते आणि त्यांची त्वचा कोमल राहण्यास मदत होते. ज्यामुळे लहान बाळ रिलॅक्स फिल करते आणि गाढ झोप घेऊ शकते.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांनो, मुलांच्या प्रश्नांनी भंडावून सोडले आहे ? मग अशी द्या उत्तरे

3. थंडीपासून वाचवा :

लहान बाळांची इम्युनिटी कमजोर असते. त्यामुळे त्यांना थंडीपासून वाचवण्या अतिशय गरजेचे असते. नाहीतर सर्दी खोकला यासारख्या समस्यांना त्यांना तोड द्यावे लागू शकते. अशातच तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग कोल्ड्र म्हणून करू शकता. असं केल्याने त्यांना बंदनाकाची समस्या होणार नाही. यासाठी तुम्ही त्यामध्ये पेपरमेंट किंवा युकीलीप्टस ऑइल टाकून लहान बाळाची मालिश करू शकता.

Parenting Tips
Parenting Tips canva

4. क्रेडल कॅपचा उपाय :

नवजात शिशुची त्वचा (Skin) अतिशय कोरडी असते. जी साफ करणे एक चॅलेंज बनून जाते. जर हे साफ केलं नाही तर ही गोष्ट वाढवून लहान बाळाला खाज येऊ शकते. अशाच नॅचरल पद्धतीने देखील क्लीन करणे हे एक चॅलेंज असते. त्यामुळे लहान बाळाच्या डोक्यावरती नारळाचे तेल टाका. त्यानंतर 20 मिनिटे तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुवून काढा. असं केल्याने लहान बाळाच्या केसांमध्ये (Hair) आणि डोक्यावर नरमपणा येईल आणि हळूहळू सगळी कोरडी स्किन निघून जाईल.

5. एक्झिमा पासून करा बचाव :

लहान बाळांना ड्राय स्कीन आणि खाजेची समस्या रात्रभर रडवत असते. नवजात बाळांमध्ये ही एक कॉमन समस्या आहे. जर तुम्ही तुमच्या लहान बाळाला रात्रीच्या वेळी नारळाच्या तेलाने मालिश कराल तर, तेलामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट आणि अँटीइम्प्लॉयमेटरीचे गुण या समस्येला अगदी सहजपणे दूर करतात. त्यामुळे तुमचे बाळ आरामात झोपू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com