Parenting Tips : काही केल्या मुलं अभ्यास करत नाहीत? ५ उपायांनी पुस्तकांशी जमेल गट्टी

Studying Tips : वारंवार सांगूनही तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर, पालकांनी त्यांच्यावर चिडचिड न करता 'या' मार्गांनी अभ्यासाची गोडी लावावी.
Studying Tips
Parenting Tips SAAM TV
Published On

काही मुलं अभ्यासाच्या बाबतीत काटेकोर आणि शिस्तबद्ध असतात. तर अनेक पालकांना काही मुलांच्या मागे अभ्यासासाठी लागावे लागते. सतत ओरडून, दम देऊनही मुलं अभ्यास करत नाहीत. यामुळे पालकांची चिडचिड होते. यावर रामबाण उपाय म्हणजे पालकांनी मुलांना 'अभ्यास 'का' करावासा वाटत नाही?' याचे कारण शोधून अभ्यासाला पूरक वातावरण निर्माण करावे.

वातावरण

मुलांनी अभ्यास नीट करावा आणि त्यांचे लक्ष अभ्यासात लागावे. यासाठी पालकांनी घरामध्ये अभ्यासपूर्वक वातावरण तयार केले पाहिजे. मुलांना अभ्यासाठी घरातील शांत आणि चांगल्या सूर्यप्रकाश येणारी जागा निवडून द्या. अभ्यास करताना त्यांना त्रास होणार नाही म्हणून पालकांनी मुलांना आरामदायी खुर्ची आणि टेबलचा वापर करायला द्यावा. शक्यतो अभ्यास करताना मुलांना फोन आणि लॅपटॉप पासून दूर ठेवावे.

वेळापत्रक

मुलांनी नियमित अभ्यास करावा यासाठी त्यांना सवय लागणे गरजेचे आहे. म्हणून त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि ते फॉलो करायची त्यांना सवय लावा. दररोज लहान लहान अभ्यासाचे गोल त्यांना सेट करून द्या आणि अभ्यास करायला लावा. १ तासाच्या अभ्यासात १० मिनिटांचा ब्रेक घ्यायला सांगा . त्यामध्ये त्यांना पोषक अन्न पदार्थ खाऊ घाला. तसेच त्यांच्या आवडीची कामे करायला त्यांना प्रोत्साहन द्या.

सोप्या युक्त्या शिकवा

मुलांना झटपट अभ्यास करता यावा म्हणून पालकांनी सोप्या अभ्यासाच्या युक्त्या त्यांना शिकवा. कठीण संकल्पना पालकांनी मुलांना समजवून सांगा. वाचलेल्या गोष्टी लिहायला आणि लिहिलेल्या गोष्टींची उजळणी करायला लावा. न समजणारा कोणताही विषय समजून घेऊनच अभ्यास करायला सांगा. नुसती घोकंपट्टी कामी कामाची नाही. इंटरनेटचा अभ्यासासाठी योग्य वापर शिकवा. म्हणजे ऑनलाइन व्हिडिओ पाहून मुलांना अभ्यास करण्याच्या युक्त्या मिळतात.

Studying Tips
Tuition For Children : मुलांना ट्युशन लावण्याआधी 'या' गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर प्रगतीवर होईल परिणाम

मानसिकता

मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून त्यांची मानसिकता चांगली असणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलांजवळ नेहमी सकारात्मक वातावरण ठेवावे. मुलांना आपल्या क्षमतेवर आणि स्वतः वर विश्वास ठेवायला शिकवा. त्याची एकाग्रता वाढवा.

झोप

मुलांनी छान अभ्यास करावा यासाठी त्यांची झोप पुरेशी झोप होणे महत्त्वाचे असते. कारण अपुऱ्या झोपेमुळे मुलांची चिडचिड होते आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. पालकांनी देखील वेळात वेळ काढून मुलांची उजळणी घेतली पाहिजे. मुलांकडून मनोरंजनातून किंवा खेळातून अभ्यासाची रुची वाढवायला पाहिजे.

Studying Tips
Father and Son Relationship : वडिलांच्या मृत्यूपूर्वी प्रत्येक मुलाने त्यांना या ५ गोष्टी सांगितल्याच पाहिजेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com